Ethical Hacking : येत्या काळात एथिकल हॅकर्सची मागणी वाढणार!! जाणून घ्या यामध्ये कसं करता येईल करिअर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । हॅकर्स म्हणजे चोर, फसवणूक करणारे, लोकांची माहिती (Ethical Hacking) चोरून त्याचा गैरवापर करणारे म्हणून ओळखले जातात. सगळेच हॅकर्स या श्रेणीत मोडत नाहीत. कारण एथिकल हॅकर्स नावाचा एक प्रकार आहे, हे हॅकर्स इंटरनेटवरील गुन्हेगार असलेल्या हॅकर्सपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. ऑनलाईन क्राईम, फ्रॉडच्या संख्येत वाढ होत असतानाच एथिकल हॅकर्सची मागणीही वाढत आहे. एथिकल हॅकिंग हे कायदेशीर मानलं जातं कारण ते कम्प्युटर सिस्टमच्या सुरक्षेसाठी वापरलं जातं. त्यामुळे अलीकडच्या काळात एथिकल हॅकर्सची मागणी वाढली आहे. या क्षेत्रात करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत…

या गोष्टी येणं आवश्यक –

तुम्हाला एथिकल हॅकर बनण्यासाठी सायबर एथिक्स, Google डेटाबेस हॅक करणं, माहिती गोळा करणं, पेनिट्रेशन टेस्टिंग, सॉफ्टवेअर तयार करणं आणि काउंटरमेझर्स या गोष्टी येत असणं आवश्यक आहे.

तुम्हाला कोणत्या गोष्टी शिकवल्या जातात – (Ethical Hacking)

एथिकल हॅकिंग शिकवणाऱ्या विविध प्रशिक्षण संस्थांचा अभ्यासक्रम वेगळा असला तरी, एकूणच तुम्ही व्हायरस अॅनॅलिसीस, ट्रोजन, बॅकडोअर्स, स्निफर्स, कीलॉगर्स, आयपी स्पुफिंग, हनीपॉट्स, सोशल इंजिनीअरिंग या गोष्टी शिकू शकाल. शिवाय, तुम्हाला एसक्यूएल (Ethical Hacking) इंजेक्शन, एक्सप्लॉइट रायटिंग आणि सिक्युअर कोडिंग यासारख्या प्रॅक्टिकल स्किल्स डेव्हलप करता येतील. इतर काही अभ्यासक्रमांमध्ये VOIP हॅकिंग, एसएमएस फोर्जिंग, वायरलेस हॅकिंग या गोष्टीही शिकवल्या जातात.

अशी होईल करिअर ग्रोथ

1. कॉम्प्युटर हॅकिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे, सुप्रसिद्ध बिझनेस, फायनॅन्शिअल इन्स्टिट्युशन आणि सरकारी संस्थांना एथिकल हॅकर्स नियुक्त करावेच लागतात.

2. एथिकल हॅकर्स या बिझनेसेसना त्यांच्या कॉम्प्युटर सिस्टिमधील विकनेस आणि संभाव्य सिक्युरिटी होल्स ओळखण्यात तसंच बाहेरील हल्ल्यांपासून त्यांचं संरक्षण करण्यात मदत करतात. एथिकल हॅकर म्हणून, तुम्ही भविष्यात चांगलं काम करू शकता. (Ethical Hacking)

3. 2023 च्या अखेरीस, गेल्या वर्षीच्या तुलनेत एथिकल हॅकर्सची मागणी 20 टक्क्यांनी जास्त असेल. त्यामुळे भविष्यात ही संख्या वाढतच जाणार आहे. शिवाय या कामात तुम्हाला नोकरीची सुरक्षितता मिळेल, कारण याचीच जगभरात मागणी आहे.

4. एथिकल हॅकिंगला नेहमीच मागणी असते. अर्थव्यवस्थेची पर्वा न करता, एथिकल हॅकर्सची आठवड्याचे सातही दिवस 24 तास गरज असते. म्हणूनच, एथिकल हॅकिंगमध्ये (Ethical Hacking) करिअर केल्याने तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं.

तुमच्याकडे पुढील स्किल्स असणे आवश्यक –
  1. सिक्युरिटी रिसर्च, मॅलार्ड रिसर्च आणि अॅनॅलिसिस
  2. C++, Python, JAVA, HTML, यासारखे कोडिंग ज्ञान.
  3. नेटवर्किंग, राउटर आणि फायरवॉलमधील स्किल्स (Ethical Hacking)
  4. माहिती सिक्युरिटी, क्लाउड सिक्युरिटी आणि सिक्युरिटी ऑडिट.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com