Engineering Admission 2024 : इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; पहा संपूर्ण वेळापत्रक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या (Engineering Admission 2024) प्रवेश प्रक्रियेसंदर्भात महत्वाची अपडेट हाती आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET CELL) इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना दि. 14 ते 24 जुलै या कालावधीत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येणार आहे. प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी येत्या 2 ऑगस्ट रोजी प्रसिध्द केली जाणार आहे.

प्रवेश प्रक्रियेसंदर्भात महत्वाच्या तारखा
सीईटी सेलच्या माध्यमातून विविध व्यावसायीक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून कॅप अंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरून घेतले (Engineering Admission 2024) जात आहेत. प्रवेशासाठी अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी येत्या 15 ते 25 जुलै या कालावधीत केली जाणार आहे. विद्यार्थ्यांची तात्पूर्ती गुणवत्ता यादी 27 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 28 ते 30 जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत हरकती नोंदवता येतील. तर 2 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.

अर्ज फी (Engineering Admission 2024) –
1. इंजिनिअरिंग प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गासाठी अर्ज भरण्यास 1,000/- रुपये शुल्क आहे.
2. आरक्षित घटकांसाठी 800/- रुपये फी आहे.
3. एनआरआय व पीआयओ कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी 10 हजार रुपये शुल्क आहे.

प्रवेश प्रक्रियेबाबतचे सविस्तर वेळापत्रक इथे पहा –
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबतचे सविस्तर वेळापत्रक सीईटी सेलच्या https://fe2024.mahacet.org/StaticPages/HomePage या लिंकवर उपलब्ध आहे. विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी वेळापत्रक पाहू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com