करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (CET) इंजिनिअरिंग (Engineering Admission 2024) प्रथम वर्ष (बीई/ बीटेक), अभियांत्रिकी थेट द्वितीय वर्ष, एमबीए आणि एमसीए (Engineering First Year (BE/ BTech), Engineering Direct Second Year, (MBA and MCA) या अभ्यासक्रमांचे प्रवेशाचे पुढील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/बीटेक) पदवी अभ्यासक्रमाची पहिली यादी दि. 14 ऑगस्टला जाहीर होणार आहे तर अंतिम गुणवत्ता यादी दि. 8 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.
प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार
अभियांत्रिकी प्रथम वर्ष बीई/बीटेक पदवी प्रवेशासाठी (Engineering Admission 2024) यावर्षी 1 लाख 92 हजार 360 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांची दि. 8 ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर 9 ते 11 ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरायचे आहेत. तर पहिली गुणवत्ता यादी दि. 14 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. या वर्षी प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार आहे त्यातील केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या तर शेवटची फेरी संस्थास्तरावर होईल. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख 13 सप्टेंबर आहे.
असं आहे प्रवेश प्रक्रियेचं संपूर्ण वेळापत्रक (Engineering Admission 2024) –
1. दि. ८ ऑगस्ट रोजी पहिली अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार.
2. दि. ९ ते ११ ऑगस्ट दरम्यान, पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदवता येणार.
3. दि. १४ ऑगस्ट रोजी पहिली प्रवेश यादी प्रसिद्ध होणार.
4. दि. १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान प्रवेश निश्चित करता येणार.
5. दि. १९ ऑगस्ट रोजी दुसर्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर केल्या जाणार.
6. दि. २० ते २२ ऑगस्ट रोजी दुसर्या यादीचे पसंतीक्रम नोंदवता येणार.
7. दि. २६ ऑगस्ट रोजी दुसरी (Engineering Admission 2024) गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार.
8. दि. २७ ते २९ ऑगस्ट या कालावधीत दुसर्या यादीतील उमेदवारांना प्रवेश घेता येणार.
9. दि. ३० ऑगस्ट रोजी तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील प्रसिद्ध केला जाईल.
10. दि. ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर रोजी पसंतीक्रम नोंदवता येणार.
11. दि. ५ सप्टेंबर रोजी तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार.
12. दि. ६ ते ९ सप्टेंबर दरम्यान तिसऱ्या यादीतील उमेदवारांना प्रवेश घेता येणार.
13. दि. १० ते १३ सप्टेंबर या कालावधीत संस्थास्तरावर उमेदवारांचे प्रवेश घेतले जाणार.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com