करिअरनामा ऑनलाईन। टेस्लाचा मालक एलन मस्क याने नुकतच ट्वीटर आपल्या (Elon Musk Twitter) ताब्यात घेतलं त्यानंतर अनेक मोठे बदल झाले आहेत. ट्वीटरच्या CEO पदावरून पराग अग्रवाल यांना हटवण्यातही आलं आहे. यासह टेस्ला मालकाने नुकतंच ट्विटर विकत घेतलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधील बदलांशी संबंधित काही मोठे निर्णय त्यांनी घेतले आहेत.
दिवसातून 12 तास आणि आठवड्यातील 7 दिवस काम
मात्र, या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे (Elon Musk Twitter) नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. CNBCच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ट्विटर अभियंत्यांना दिवसातून 12 तास आणि आठवड्यातून सात दिवस काम करण्यास सांगण्यात आलं आहे. एलन मस्क यांनी ठेवलेलं टार्गेट वेळेत पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त तास काम करावं लागेल असं ट्वीटरच्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे.
टार्गेट पूर्ण करण्यासाठी वाढवली वेळ
ट्वीटरच्या कर्मचाऱ्यांना काही आक्रमक निर्णय पूर्ण करण्यासाठी एलन मस्कने हे काम दिल्याची माहिती मिळत आहे. यासाठी कामाच्या वेळेत वाढ करण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे.
.. तर नोकरीही जावू शकते
आता ट्विटर कर्मचाऱ्यांना 12 तासांची शिफ्ट (Elon Musk Twitter) करावी लागणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम देण्याबाबत किंवा त्यांच्या नोकरीच्या सुरक्षेबाबत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. एलन मस्क यांचे आदेश पाळले नाहीत आणि त्यांना हव्या असलेल्या गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत तर कर्मचाऱ्यांची नोकरीही जाऊ शकते अशी मार्केटमध्ये चर्चा सुरू झाली आहे. एलन मस्क 50 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे नोकरी जाऊ नये या धास्तीमुळे कर्मचारी नाईलाजाने काम करत आहेत. तर काही कर्मचारी नोकरी सोडण्याच्या तयारीत आहेत
Blue Tick साठी मोजावे लागणार पैसे (Elon Musk Twitter)
यासोबत फ्री असलेलं ब्लू टिक आता चार्ज करण्यात आलं आहे. ब्लू टिकसाठी आता दर महिन्याला 8 डॉलर द्यावे लागणार आहेत. टेस्ला मालकाने नुकतंच ट्विटर विकत घेतलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधील बदलांशी संबंधित काही मोठे निर्णय त्यांनी घेतले आहेत.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com