करिअरनामा ऑनलाईन। ट्विटरची मालकी एलन मस्क यांच्याकडे (Elon Musk Twitter) आल्यानंतर त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले. त्यामधील एक निर्णय तर 50 टक्के कर्मचारी काढण्याचा होता. त्यानुसार त्यांनी एका झटक्यात 7500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. जवळपास 50 टक्के स्टाफ कमी केला. याशिवाय दररोज 12 तासांची ड्युटी आणि 7 दिवस काम करण्याच्या सूचनाही दिल्या.
याबाबत ट्विटरचे प्रमुख एलन मस्क यांनी आपल्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी कर्मचारी काढल्याच्या बातमीवर शिक्कमोर्तब केला आहे. जेव्हा (Elon Musk Twitter) कंपनीला दररोज 4 दशलक्ष डॉलर्स (32 कोटींपेक्षा जास्त) तोटा सहन करावा लागत आहे, तेव्हा दुर्दैवाने इतर कोणतेही पर्याय माझ्याकडे उरत नाही असं त्यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.”
Regarding Twitter’s reduction in force, unfortunately there is no choice when the company is losing over $4M/day.
Everyone exited was offered 3 months of severance, which is 50% more than legally required.
— Elon Musk (@elonmusk) November 4, 2022
रिपोर्ट्सनुसार, मस्क यांनी भारतातील संपूर्ण मार्केटिंग आणि कम्युनिकेशन टीमला काढून टाकले आहे. तर इंजिनिअरिंग, सेल्स आणि पार्टनरशिप टीमवरही (Elon Musk Twitter) परिणाम झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 50 टक्के कर्मचारी काढण्यात आले आहेत. मात्र किती कर्मचारी काढले याबाबत अजून ट्विटर किंवा एलन मस्क यांनी अधिकृत आकड्यावर शिक्कमोर्तब केलं नाही.
मस्क यांनी नुकतीच व्हेरिफाइड अकाउंट्स/ब्लू टिकसाठी महिन्याला 660 रुपये द्यावे लागणार असल्याच्या सूचना दिल्या आहेत. कंपनीचा महसूल वाढवण्यासाठी आणि मायक्रोब्लॉगिंग साईटचे बनावट व्हेरिफाइड अकाउंट्सपासून संरक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलणे गरजेचं असल्याचा दावा मस्क यांनी केला.
जर व्हेरिफाइड अकाउंट हवं असेल तर 8 डॉलर भरू (Elon Musk Twitter) शकतो त्यामुळे मला त्याचं दु:ख नाही ते कोणालाही भरणं अगदी सहज शक्य असल्याचं मस्क यांनी म्हटलं होतं. त्यावरून सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकाही करण्यात आली होती.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com