Educational Scholarship : गरीब विद्यार्थ्यांसाठी रिलायन्स फाऊंडेशन देणार शिष्यवृत्ती!! अर्ज प्रक्रिया झाली सुरु

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही पैशांअभावी तुमचा (Educational Scholarship) महाविद्यालयीन अभ्यास पूर्ण करू शकत नसाल किंवा फी भरण्यात अडचणी येत असतील तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये (HEIs) आयोजित केल्या जाणार्‍या विविध अंडरग्रेजुएट (UG) आणि पदव्युत्तर (PG) स्तरावरील अभ्यासक्रमांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना देशातील सर्वात मोठे द्योगिक समूह रिलायन्स फाऊंडेशन कडून आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. रिलायन्स फाउंडेशनने 5000 UG शिष्यवृत्ती आणि 100 PG शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स फाऊंडेशनने UG स्कॉलरशिपसाठी जास्तीत जास्त 2 लाख रुपये आणि PG स्कॉलरशिपसाठी जास्तीत जास्त 6 लाख रुपये निर्धारित केले आहेत.

स्कॉलरशिपसाठी इथे करा अर्ज –
रिलायन्स फाऊंडेशनने ऑफर केलेल्या UG आणि PG शिष्यवृत्तीसाठी (Educational Scholarship) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. जे विद्यार्थी त्यांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती शोधत आहेत त्यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या scholarships.reliancefoundation.org या पोर्टलला भेट देवून तुमचा अर्ज करायचा आहे. शिष्यवृत्तीच्या दोन्ही श्रेणींसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे.

शिष्यवृत्तीसाठी काय आहे पात्रता? (Educational Scholarship)
अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी UG आणि PG शिष्यवृत्तीसाठी विहित केलेल्या पात्रता अटी जाणून घेतल्या पाहिजेत. रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृत्ती पोर्टलनुसार, देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थेतील कोणत्याही अभ्यासक्रमात यावर्षी प्रथम वर्ष/सेमिस्टरचे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. तसेच पीजी अभ्यासक्रमांसाठी पीजी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर दोन्ही शिष्यवृत्तींबद्दल अधिक माहिती पाहू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com