करिअरनामा ऑनलाईन। दहावी-बारावीचे मार्क्स आयुष्याची दिशा ठरवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने दहावी-बारावीचं (Education Success Story) वर्ष महत्वाचं समजलं जातं. दहावीच्या परीक्षेतील कामगिरीवर कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं हे ठरतं. तर बारावीच्या निकालानंतर करिअरची दिशा स्पष्ट होते. जुलै महिन्यांमध्ये सीबीएसई बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकाला लागला. या परीक्षेला देशभरातील विद्यार्थी बसतात. त्यामुळे याचे महत्त्व मोठे आहे. या परीक्षेत घाटकोपरच्या काश्वी कामतला 97.8 टक्के मार्क्स मिळाले होते. या घवघवीत यशानंतरही काश्वी समाधानी नव्हती. आपल्याला यापेक्षा देखील जास्त मार्क्स पडतील असा तिचा विश्वास होता. त्यामुळे तिने पेपरच्या फेरतापसणीसाठी अर्ज केला. फेरतपासणीच्या निकालामध्ये तिचा आत्मविश्वास खरा ठरला. काश्वी आता राज्यातील संयुक्त टॉपर (Joint topper in the state) बनली आहे.
फेरतपासणीमध्ये खरा ठरला आत्मविश्वास
घाटकोपरमध्ये राहाणाऱ्या काश्वी कामत बोरिवलीच्या एम. के. व्ही. व्ही. इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी होती. बारावीच्या परीक्षेत 97.8 टक्के मार्क्स तिला मिळाले होते. काश्वीला यापेक्षा अधिक मार्क्स आपल्याला मिळतील याची खात्री होती. याच आत्मविश्वासातून तिनं पेपर्स फेरतपासणीसाठी टाकण्याचा निर्णय (Education Success Story) घेतला.
काश्वीचा हा विश्वास फेरतपासणीमध्ये खरा ठरला. तिचे बायलॉजी आणि केमिस्ट्री या विषयांमधील मार्क्स वाढले. त्यामुळे ती आता 99 टक्के मार्क्स मिळवून राज्यातील संयुक्त टॉपर ठरली आहे. काश्वी आता राज्यात पहिली आली आहे.
कॉम्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगची आवड (Education Success Story)
या यशानंतर काश्वी आनंदी आहे. “मला कॉम्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग या दोन्ही क्षेत्रांमध्ये रस आहे. बेंगळुरूच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ मध्ये संशोधक म्हणून संधी मिळाली आहे. यापैकी कोणते क्षेत्र निवडायचे याचा अंतिम निर्णय घेणे बाकी आहे;” असे काश्वीने सांगितले.
आई-वडील म्हणतात…
“आपल्या जास्त मार्क्स मिळतील हा काश्वीला आत्मविश्वास होता. फेरतपासणीमध्ये ते सिद्धही झाले. पुढील वाटचालीमध्ये असा आत्मविश्वास असणे आवश्यक आहे,” अशी भावना काश्वीच्या (Education Success Story) आई दीपा कामत यांनी व्यक्त केली. तर “काश्वीनं कॉम्पुटर सायन्स किंवा इंजिनिअरिंग यापैकी ज्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याचे ठरवेल त्याला आमचा पाठिंबा असेल. यापुढील आयुष्यातील सर्व टप्प्यांमध्ये आम्ही तिला मदत करू;” असे काश्वीचे वडील कृष्णा कामत यांनी स्पष्ट केले.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com