Education Scholarship : रिलायन्स फाउंडेशन देणार 6 लाखाची स्कॉलरशिप; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । रियालन्स फाउंडेशनने विद्यार्थ्यांच्या (Education Scholarship) हितासाठी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. रियालन्स फाउंडेशन विद्यार्थ्यांना तब्बल 6 लाखांपर्यंत Scholarship देणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी कुठे आणि कसा अर्ज करायचा याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

5100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार
2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी रिलायन्स फाऊंडेशनने ही शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. सुमारे 5100 विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. देशभरातील ज्या (Education Scholarship) विद्यार्थ्यांना कोणत्याही पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश हवा आहे, ते यासाठी अर्ज करू शकतात. पदवी अभ्यासक्रमात प्रत्येक विषयात शिष्यवृत्ती दिली जात आहे. प्रत्येक पदवीधर विद्यार्थ्याला 2 लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

आवश्यक पात्रता (Education Scholarship) –
– जे विद्यार्थी पदवीपूर्व किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेणार आहेत ते या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. पदवी अभ्यासक्रम करत असलेले विद्यार्थी कोणत्याही विषयात अर्ज करू शकतात. त्यांना गुणवत्ता आणि कौटुंबिक उत्पन्नाच्या आधारे शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
– पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि जीवन विज्ञान विषयांमध्ये शिष्यवृत्ती दिली जात असून ती केवळ गुणवत्तेच्या आधारावर दिली जाईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 6 लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

6 ऑक्टोबर पर्यंत करता येणार अर्ज
रिलायन्सने आतापर्यंत 23 हजारहून अधिक (Education Scholarship) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी रिलायन्स फाउंडेशनच्या www.scholarships.reliancefoundation.org अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑक्टोबर 2024 आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com