Education : आता नवीन कॉलेजांना परवानगी नाही, उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या एकाही (Education) नवीन कॉलेजला यावर्षी परवानगी दिली जाणार नाही. मात्र, रोजगाराभिमुख असणाऱ्या नवीन अभ्यासक्रमांना परवानगी मागितल्यास ती दिली जाईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.

राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन’ या विषयावरील एकदिवसीय परिषदेचे मुंबई विद्यापीठात आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पाटील यांनी ही माहिती दिली. कला आणि वाणिज्य (Education) शाखेच्या ‘पारंपरिक अभ्यासक्रमाऐवजी रोजगार देणारे अभ्यासक्रम सुरू करणे आवश्यक आहे. महाविद्यालयात सुरू करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये 70 टक्के विषय नोकरी मिळविण्यासाठी उपयुक्त ठरणारे आणि 30 टक्के माणूस म्हणून घडवणारे ठेवा,’ असेही पाटील यांनी नमूद केले.

NAAC मूल्यांकन अनिवार्य (Education)

‘राज्यात सद्यस्थितीत ४४९४ कॉलेज तर ६५ विद्यापीठे आहेत. त्यातील १८५४ कॉलेजांचे नॅक मूल्यांकन झाले आहे. त्यातील अनुदान मिळणाऱ्या कॉलेजांचे मूल्यांकन झाले आहे. ११७७ पैकी १०९६ कॉलेजांचे मूल्यांकन झाले आहे. मात्र, विनाअनुदानित २,१४१ कॉलेजांपैकी १,९०९ कॉलेजांनी नॅकचे मूल्यांकन केले नाही. हा महाराष्ट्र सरकारसाठी चिंतेचा विषय आहे’, असेही पाटील म्हणाले.

तसेच, ‘राज्यातील कॉलेजांनी नॅक मूल्यांकन करून घेणे गरजेचे आहे. नॅक मूल्यांकन करण्यासाठी काही अडचणी असल्यास सरकार सर्व सहकार्य करेल. परंतु नॅक (Education) मूल्यांकनामध्ये मागे राहू नये. हे मूल्यांकन ऐच्छिक नसून अनिवार्य आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्रक्रिया लवकर सुरू करावी’, असे आवाहनही यावेळी पाटील यांनी केले.

टप्प्याटप्प्याने होणार प्राध्यापक भरती

राज्यात प्राध्यापकांच्या २,०८८ जागांच्या भरतीसाठी परवानगी दिली आहे. रोस्टर प्रक्रिया राबवून भरती करावी, अशी सूचना देऊनही ती पाळण्यात आलेली नाही. यातील ८०० कॉलेजांनी त्यांच्या (Education) भरतीसाठी आवश्यक परवानगी मागितल्या नाहीत. त्यामुळे या २,०८८ जागांची भरतीप्रक्रिया पूर्ण झाल्यावर उर्वरित जागांसाठी टप्प्याटप्प्याने भरती प्रक्रिया राबविली जाईल, असेही पाटील यांनी नमूद केले.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com