करिअरनामा ऑनलाईन। हल्ली सर्वांचाच ओढा असतो तो ट्रेण्डिंग विषयांकडे. या पार्श्वभूमीवर (Education) अनेक विषय ट्रेण्डमध्ये नसल्याने मागेच राहतात. प्रत्यक्षात समाजाच्या दृष्टीने विचार करायचा तर इतर विषयही समाजाच्या दृष्टीने तेवढेच महत्त्वाचे असतात. मात्र त्या विषयांकडे वळायचे तर आर्थिक मदतीची शक्यता नसते, अशा वेळेस या शिष्यवृत्ती मुलींना मदतीचा हात पुढे करतात. वेगवेगळया सामाजिक आणि मानसिक समस्यांचा उच्चस्तरीय अभ्यास करणे महिलांना सुलभ जावं, यासाठी टाटा सामाजिक ट्रस्ट मार्फत, लेडी मेहरबाई जी. टाटा एज्युकेशन शिष्यवृत्ती दिली जाते.
शिष्यवृत्तीचे विषय –
(१) समाजकार्य
(२) मानसशास्त्र, विधि (फक्त महिला आणि मुलांच्या संदर्भातील तज्ज्ञतेकरता),
(३) शिक्षण- तसेच शिक्षकांचं प्रशिक्षण
(४) विशेष गरजा असणाऱ्या मुलांचं शिक्षण आणि विकास,
(५) जेंडर स्टडीज – महिला आणि मुलांवर होणारी हिंसा. यामध्ये घरगुती आणि इतरांव्दारे होणाऱ्या हिंसेचा समावेश आहे.
(६) एकल महिला आई, एकल महिला आणि विवाहित महिलांच्या विविध समस्या(७) मुलांचे आरोग्य-विकास आणि पोषण आहार
(८) आरोग्य धोरण आणि आरोग्य शिक्षण- मानसिक आरोग्य
(९) सार्वजनिक आरोग्य- सामुदायिक आरोग्य सेवा
(१०) साथरोगशास्त्र/ रोगपरिस्थिती विज्ञान (Education)
(११) पुनुरुत्पादन आणि आरोग्य
(१२) महिला आणि मुलांच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने विकासासाठी जनसंप्रेषण (कम्युनिकेशन)
(१३) पौंगडावस्थेतील समस्या
(१४) समुदायातील सामाजिक नीतीनियमांचा अभ्यास
(१५) सामुदायिक विकास
(१६) ग्राम विकास
(१७) सार्वजनिक धोरण
(१८) लोक प्रशासन
(१९) सामाजिक धोरण
(२०) सामाजिक विकास
(२१) महिला आणि मुलांच्या अनुषंगाने शाश्वत विकास
(२२) तुरुंगात असणाऱ्या महिला
पात्रता –(Education)
- या विषयांमध्ये परदेशात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या व अमेरिका, इंग्लंड आणि युरोपातील नामवंत विद्यापीठ किंवा शिक्षण संस्थेत प्रवेश मिळालेल्या महिला उमेदवार या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात.
- पदवी परीक्षेत उत्तम कामगिरी करणाऱ्या महिला उमेदवार या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु शकतात.
- पदव्युत्तर अभ्यास किंवा संशोधन करू इच्छिणाऱ्या विषयांमध्ये संबंधित महिला उमेदवारास दोन वर्षाचा अनुभव असावा.
निवड प्रक्रिया –
अर्ज केलेल्या महिला उमदेवारांच्या गुणवत्तेनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाते.
त्यातील निवडक महिलांना मुलाखतीसाठी बोलावलं जातं.
या मुलाखती ट्रस्टींमार्फत (विश्वस्त) घेतल्या जातात.
या शिष्यवृत्ती अंतर्गत, संबंधितांना शिक्षण शुल्काचं सहाय्य केलं जातं.
ही रक्कम, संबंधित विद्यार्थिनींची मुलाखतीमधील कामगिरी पाहून, किमान तीन लाख ते कमाल सहा लाख रुपयांपर्यंत राहू शकते. (Education)
निवड झालेल्या विद्यार्थिनी त्यांची शैक्षणिक खर्चाच्या गरज कशा भागवू शकतील, हे सिध्द करण्यासाठी वित्तीय पुरवठ्याचा लेखी पुरावा सादर करावा लागेल.
असा करा अर्ज –
या शिष्यवृत्तीचा अर्ज मिळण्यासाठी, डिजिटल लिंक पाठवण्याची विनंती [email protected] या ईमेलवर करा.
आवश्यक कागदपत्रे –
(१) अभ्यासक्रम आणि स्पेशलायझेशन,
(२) कालावधी,
(३) विद्यार्थिनीने निवडलेल्या विद्यापीठांची पसंतीक्रमानुसार यादी (असल्यास)
/प्रवेश निश्चितीचे पत्र,
(४) प्रत्येक विद्यापीठासाठी लागणारे शिक्षण शुल्क,
५) निधीची उपलब्धता कशी करणार याची थोडक्यात माहिती,
(६) सध्याचा बायोडाटा.
सूचना – स्पष्ट दिसतील अशा पध्दतीने प्रमाणपत्रे स्कॅन करुन पाठवा.
अपूर्ण अर्ज स्वीकारले जात नाहीत.
संपर्कासाठी पत्ता – बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, मुंबई-४००००१,
दूरध्वनी- ०२२-६६६५८२८२,
अधिकृत वेबसाइट – http://tatatrusts.org
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com