करिअरनामा ऑनलाईन । नव्या शैक्षणिक वर्षापासून (Education) शिक्षण क्षेत्रात नवे बदल केले जाणार आहेत. या धर्तीवर इयत्ता पहिलीपासून अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश केला जाणार आहे; अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे.
पहिलीपासूनच शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. त्यामुळे पहिलीच्या वर्गापासून विद्यार्थ्यांना आता शेतीचे धडे मिळणार आहेत. दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या दौऱ्यावर असताना मंत्री केसरकर यांनी ही घोषणा केली. कृषी शिक्षण काळाजी गरज झाली आहे. त्याचबरोबर भविष्यातील गरज ओळखून पहिलीपासूनच आता विद्यार्थ्यांना कृषी विषयाचे धडे दिले जाणार आहेत, असं मंत्री केसरकर म्हणाले.
शेती व निसर्गाचे धडे दिले जाणार (Education)
केसरकर म्हणाले की, निसर्गाची सध्या मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. त्यामुळे भविष्यातील कृषी शिक्षणाची गरज ओळखून राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच शेती व निसर्गाचे धडे दिले जाणार आहेत. मुलांमध्ये जर निसर्गाची आवड निर्माण करायची असेल तर कृषी शिक्षणाला पर्याय नाही म्हणून आता पहिलीपासून कृषी हा विषय अनिवार्य केला जाणार आहे.
केसरकर यांनी सांगितलं की, आगामी शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीपासून कृषी शिक्षण सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. कृषी शिक्षणासाठी शिक्षण विभागाने नवा मसुदा तयार (Education) केला आहे. या नव्या विषयाचा अभ्याक्रमात समावेश करण्यापूर्वी शिक्षकांना देखील याचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे. अनेक शिक्षकांनी कृषी विषयाचं शिक्षण घेतलेलं नसतं, कोणी बीएस्सी बीएड केलं आहे, कोणी बीए बीएड केलं आहे, तर कोणी एचएससी डीएड केलं आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना देखील कृषी विषयाचं प्रशिक्षण दिले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com