करिअरनामा ऑनलाईन। एखाद्या परिक्षेत तुम्हाला आधी चांगले गुण मिळाले असतील आणि नंतर ते कमी झाले (Education) तर तुम्हाला कसं वाटेल? चंद्रपुरात राहणाऱ्या देवती मोरेसोबत अशीच घटना घडली आहे. देवतीनं यावर्षी NEETची परीक्षा दिली. ७ सप्टेंबरला रात्री तिनं निकाल पाहिला. देवतीला ५७० गुण मिळाले होते. मात्र दुसऱ्या दिवशी निकाल पाहिला त्यावेळी तिचे गुण १२९ होते.
NTA नं NEET परीक्षेची Answer Key आणि OMR शीट जारी केली गोती. ती देवतीनं तपासली. त्यात तिचे गुणे ५७० इतके होते. ८ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता देवतीनं निकाल पाहिला. त्यात ५७० गुण दिसत होते, असं देवतीनं सांगितलं. त्यावेळी निकाल डाऊनलोड होत नव्हता. त्यानंतर रात्री ९ वाजता निकाल तपासून (Education) पाहिला. तेव्हाही ५७० गुणच दिसत होते. मात्र पुढल्या दिवशी साईटवर लॉग इन केल्यावर १२९ गुण दिसू लागले. काहीतरी तांत्रिक चूक असेल असं मला वाटलं. त्यामुळे मी NTA नं मला मेल केला. मात्र कोणताच प्रतिसाद मिळाला नाही, असं देवतीनं सांगितलं.
देवतीनं पहिल्यांदा निकाल पाहिला. त्यावेळी नेटवर्कची समस्या असल्यानं तो डाऊनलोड होऊ शकला नाही. तिनं टॅबवर निकालाचा स्क्रीनशॉट काढला. मात्र दुसऱ्या दिवशी निकाल तपासताच तिला वेबसाईटवर आधीपेक्षा कमी गुण दिसू लागले. “माझ्या मुलीला ५७० गुण मिळाले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी तिचे गुण बदलले, असं देवतीच्या आई अर्चनानं सांगितलं. आम्ही (Education) काय करावं? कुठे जावं? कोणाकडे न्याय मागावा?” असा प्रश्न अर्चना मोरेंनी विचारला आहे. “माझी मुलगी अतिशय त्रस्त आहे. दोन दिवसांपासून ती जेवलेली नाही;” असं अर्चना म्हणाल्या.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com