करिअरनामा ऑनलाईन । Dream 11 हे मोबाईल गेमिंग अॅप क्रिकेट (Dream 11 Recruitment) प्रेमींमध्ये चंगलच फेमस आहे. आता याच ड्रीम इलेव्हन कंपनीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. मात्र कंपनी सध्या क्रिकेटसाठी नाही; तर दुसऱ्या विभागात उमेदवारांची भरती करत आहे. त्यासाठी त्यांनी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही कंपनी असोसिएट मॅनेजर व बिझनेस अॅनॅलिटिक्स या पदासाठी अनुभवी उमेदवारांच्या शोधात आहे.
Dream 11 च्या मुंबई ऑफिससाठी ही भरती होणार आहे. निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना SQL, Python इत्यादी टूल्सचा वापर करून योग्य मेट्रिक्स डिझाईन आणि (Dream 11 Recruitment) इन्स्ट्रुमेंटेशनद्वारे बिझनेस हेल्थ डॅशबोर्ड तयार करावे लागतील. या नोकरीसाठी पात्रता आणि कोणती स्कील्स आवश्यक आहेत, त्याबद्दल जाणून घेवूया. या संदर्भात ‘स्टडी कॅफे’ने वृत्त दिलं आहे.
Dream 11 मध्ये जॉब मिळवण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा – (Dream 11 Recruitment)
1.अॅनॅलिटिकल सोल्युशनिंग स्कील्स वापरून मोठ्या प्रमाणावर वास्तविक बिझनेस प्रॉब्लेम्स सोडवणं.
2. डिझाईन आणि प्रयोगांचं विश्लेषण (A/B चाचण्या, सिंथेटिक नियंत्रण इत्यादी.) आणि उत्पादन वैशिष्ट्यांना प्राधान्य देण्यासाठी मदत करणं.
3. डेटाद्वारे युजर्सना इनसाइट्स प्रदान करणं, युजर्सचं विभाजन, दीर्घकालीन ट्रेंड आणि वर्तणूक विश्लेषण.
4. ऑर्गनायझेशनल स्ट्रॅटर्जी व प्रॉडक्ट रोडमॅप्ससाठी बिझनेस व प्रॉडक्ट टीमसोबत काम करणं.
5. SQL, Python इत्यादी टूल्सचा वापर करून योग्य मेट्रिक्स डिझाईन आणि इन्स्ट्रुमेंटेशनद्वारे बिझनेस हेल्थ डॅशबोर्ड तयार करणं.
अशा आहेत पात्रतेच्या अटी –
1. दोन वर्षांपेक्षा जास्त अॅनॅलिटिकल अनुभव. (Dream 11 Recruitment)
2. SQLमध्ये काम करण्याचा अनुभव. (Dream 11 Recruitment)
3. गूगल अॅनॅलिटिक्स, लूकर, PowerBI व Tableau इत्यादी टूल्समध्ये काम करण्याचा अनुभव.
4. पायथॉनसारख्या स्टॅटिस्टिकल अॅनॅलिसिस लँग्वेजचा अनुभव.
या पदासाठी अर्ज करण्यास तुम्ही इच्छुक असाल तर ड्रीम इलेव्हनच्या अधिकृत वेबसाईट https://www.dream11.com/ ला भेट द्या. तिथे दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही या नोकरीसाठी पात्र असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. वर दिलेल्या पात्रतेच्या अटी तुम्ही पूर्ण करत असाल, व तुम्हाला ड्रीम इलेव्हनमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज कसा करायचा या संदर्भात त्यांच्या वेबसाईटवर सविस्तर (Dream 11 Recruitment) माहिती दिली असेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीच्या मुंबई ऑफिसमधून काम करावं लागेल, असं कंपनीने ही जाहिरात प्रसिद्ध करताना म्हटलं आहे. त्यामुळे तुम्हाला क्रिकेटची आवड असली तरी तुम्हाला कंपनी भरती करत असलेल्या पदाच्या पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com