अभ्यास कसा करावा समजत नाही ? वापरा या टिप्स

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । अभ्यास कसा  करायचा ? हा सर्वानाच पडणारा प्रश्न. दहावी, बारावी, ग्रॅज्युएशन अशा सर्वच इयत्ता शिकत असताना या प्रश्नाला सामोरं जावं लागतं. तुमच्यासाठी करिअरनामा टीम घेऊन आली आहे काही खास टिप्स. बघा अभ्यास सोपा होतोय का?

1)  कधीही जास्त वेळ अभ्यासाला बसू नका. तासभराने दहा मिनिटांचा ब्रेक हवाच.

2) अभ्यासासाठी टाइमटेबल बनवा. त्याचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी मित्रांना आणि घरी जाहीर करून टाका. म्हणजे ते फॉलो करण्यासाठी घरातल्यांची मदतच होईल.

3) अभ्यास करणं म्हणजे घोकंपट्टी नको. संकल्पना समजून घेऊन अभ्यास केलेला चांगला.

4)  एखाद्या गोष्टीमुळे टाइमटेबल फॉलो झालं नसेल तर तसं नोट डाऊन करून ठेवा.

5)  फ्रेश वातावरण असलेल्या ठिकाणी अभ्यासाला बसा.

6)  वाचताना महत्त्वाची वाक्य, शब्द अधोरेखीत करून ठेवा. पुन्हा तो धडा चाळताना त्याचा उपयोग होईल. तसंच, दिवसांतला 15 मिनिटांचा वेळ उजळणीसाठी ठेवा.

7) सुट्टी असताना स्वत:ची टेस्ट घेऊन मार्कही द्या. अभ्यास कुठपर्यंत पोचलाय हे कळेल.

8) अभ्यास करताना फळं आणि पाणी थोड्या थोड्या वेळाने घेत राहा.

9) दहावीला असलेल्या विद्यार्थ्यांनी सुट्टीत करिअर कौन्सिलरकडून अॅप्टिट्यूट टेस्ट करून घ्यालला हवी. जेणेकरून आपला कल, क्षमता लक्षात येऊन अकरावीला शाखा निवडसाठी सोपं जाईल.

10) बारावीला गेलेल्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासाक्रमाकडे वळायचं असल्यास त्याची माहिती मिळावयला सुरुवात करा. अभ्यासक्रमांतले बदल याकडेही लक्ष ठेवायला हवं.

11) तसंच, जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनला आहेत त्यांनी आपलं करियर अधिक फोकस्ड ठेवायला हवं. पुढे शिकायचं असल्यास त्याची माहिती मिळावायला हवी. खासगी नोकरी करयाची असल्यास संवाद कौशल्य वाढवायला हवं.

नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”