करियरनामा ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या या काळात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे लोकाना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. आपण जिथे जिथे पहाल तिथे अशी एक तरी बातमी असते की मोठ्या कंपन्या आपल्या लोकांना नोकर्यावरून काढत आहेत. त्यामुळे अशावेळी प्रत्येक व्यक्तीला या साथीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, आम्ही आपल्यासाठी घरातल्या घरातच बसून आपला व्यवसाय सुरु करण्याची कल्पना सुचवित आहोत. हा व्यवसाय अगदी कमी खर्चात सुरू केला जाऊ शकतो आणि त्याच्यातून भरपूर कमाई देखील मिळू शकते. यासाठी घराचे छप्पर आणि खुले अंगण याची आवश्यकता आहे. आजकाल,टेरेस फार्मिंग ही एक ट्रेंड होत आहे, ज्याच्यामुळे आपल्याला रोख पैसे मिळवण्याची चांगली संधी उपलब्ध होते आहे. या तंत्रामध्ये मातीचा वापर केला जात नाही आणि वनस्पतींसाठी आवश्यक असलेली पोषकद्रव्य पाण्याच्या मदतीने वनस्पतींच्या मुळांपर्यंत थेट पोचविली जातात, याला हायड्रोपोनिक्स असे म्हणतात.
आज आम्ही तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी एक खास कल्पना सांगत आहोत. हा व्यवसाय सुरू करुन आपण चांगली कमाई करू शकता. घरातील छतावर शेती करण्याची ही कल्पना आहे, ती स्वीकारून आयआयटी पदवीधर कौस्तुभ खरे आणि साहिल पारीख यांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे.
खेतीफाई ही त्यांची कंपनी अवघ्या १९ हजार रुपयात २०० चौरस मीटर टेरेसला फार्म बनवून ७०० किलोग्रॅमपर्यंतच्या भाज्या पिकवते. चला तर त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात …
विना मातीची कमी पाण्याची शेती
या दोघांनीही एक असे मॉडेल तयार केले आहे ज्यामध्ये माती वापरली जात नाही आणि पाण्याचा वापर देखील कमीतकमी केला जातो. यामध्ये टेरेस फार्मिंगसाठी, एक बेड बनविला जातो जो वॉटर प्रूफ असतो आणि छतावरून पाणीही गळत नाही. जैविक गोष्टींचा वापर केल्यामुळे भेंडी, टोमॅटो,पालक ,मेथी ,वांगी, मिरच्याही येथे चांगल्या वाढतात. आणि शिवाय पाणीही गोड असल्याने भाज्याही चवदार असतात.
यामध्ये नारळाचे कवच (कोरडे साल) प्रामुख्याने घातले जाते. छतावर जास्त वजन पडू नये नाही आणि पाणी गळतीही होऊ नये यासाठी मातीचा वापर केला जात नाही. या बेडमध्ये, नारळाच्या कवट्यां बरोबरच काही मिश्रण ओतले जातात, ज्यामुळे पीक अगदी जलद आणि गुणवत्तेसह येते.
आपण हे देखील करू शकता
ज्या प्रकारे लागवडीसाठी जमीन कमी होत आहे, भविष्यात या बेड्सची मागणी आणखीनच वाढेल, एक कुटुंब ४ फूट बाय ४ फूटांचे चार बेड लावून आपल्या महिन्याभराचा भाजीपाला वाढवू शकतील. या बेडवर रोज एक तास वेळ घालवून भाजीपाला पिकवता येतो.
शेतजमीन कमी होत असल्याने आणि ऑर्गनिक फूड प्रोडक्टची वाढती मागणी यामुळे अर्बन फार्मिंगमध्ये नवीन आणि प्रभावी तंत्राचा वापर वाढत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी आणि शहरी शेतकरी छप्परांवर, पार्किंगमध्ये किंवा कोठेही उपलब्ध असलेल्या मर्यादित जागाही वापरत आहेत.
सध्या या तंत्रात जे तंत्र सर्वात यशस्वी आहे त्यामध्ये मातीचा वापर केला जात नाही. माती नसल्यामुळे,छतावरील छोट्याशा जागेतही हे सहजपणे करता येते. हे तंत्र इतके यशस्वी झाले आहे की आपण योग्य माहिती, योग्य सल्ल्यासह जवळपास १ लाख रुपयांच्या खर्चावर वर्षाकाठी आपण २ लाख रुपयांपर्यंतच्या भाज्या पिकवू शकतो.
टेरेस फार्मिंग
या तंत्राला हाइड्रोपोनिक्स असे म्हणतात. या तंत्राची एक खास गोष्ट अशी आहे की त्यात माती वापरली जात नाही. याद्वारे, वनस्पतींसाठी आवश्यक असलेली पौषणतत्त्वे पाण्याच्या मदतीने थेट वनस्पतींच्या मुळांपर्यंत पोहोचविली जातात.
हाइड्रोपोनिक्स तंत्र म्हणजे काय ?
हायड्रोपोनिक्स या तंत्रात भाज्या मातीच्या मदतीशिवाय पिकवल्या जातात. याद्वारे, वनस्पतींसाठी आवश्यक असलेली पौषणतत्त्वे पाण्याच्या मदतीने थेट वनस्पतींच्या मुळांपर्यंत पोहोचविली जातात. मल्टी-लेयर फ्रेमच्या मदतीने वनस्पती पाईपच्या साहाय्याने वाढतात आणि त्यांची मुळे पाईपच्या आत पोषक-तत्वांनी समृद्ध असलेल्या पाण्यात सोडली जातात. माती नसल्यामुळे छतावरील भारही वाढत नाही. त्याच वेळीया पूर्णपणे भिन्न प्रणालीमुळे, छतामध्ये कोणताही बदल देखील होत नाही.
नवीन तंत्रज्ञान
हाइड्रोपोनिक्स हा वनस्पती वाढविण्याचा एक पूर्णपणे नवीन मार्ग आहे ज्याला शेतकरी किंवा व्यावसायिक वेगवेगळ्या प्रकारे वापरुही शकतात. त्याच वेळी, या क्षेत्रात काम करणार्या बर्याच कंपन्या आपल्याला या हौशी बागकामापासून ते कमर्शियल फार्मिंग करण्यापर्यंत आपल्याला मदत देखील करू शकतात. याबाबतीत हाइड्रोपोनिक्स कंपनी ‘अवर एग्रीकल्चर’ म्हणते की, यासाठीचे रेडिमेड फ्रेम आणि टॉवर गार्डन याची ऑनलाईन विक्री केली जात आहे.
कंपनीच्या २ मीटर उंच टॉवरमध्ये ४० रोपे लावण्यासाठी जागा आहे. कंपनीच्या मते,४०० रोपट्यांसह १० टॉवर्सची किंमत ही १ लाखांच्या आसपास आहे. या किंमतीत टॉवर्स, सिस्टम आणि आवश्यक पोषक घटकांचा समावेश आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार जर या प्रणालीचा योग्य पद्धतीने वापर केला गेला तर फक्त बियाणे आणि पोषकद्रव्ये यांचाच खर्च होतो. आपल्या छतावरच्या १५० ते २०० चौरस फूट क्षेत्रात असे १० टॉवर्स अगदी सहजपणे उभे राहू शकतील. छोट्या ठिकाणी ठेवलेल्या फ्रेम्स झाकून मोठ्या प्रमाणातील लागवडीसाठी नेट शेड तसेच पॉली हाऊस बनवून ठेवल्यास हवामानापासून संरक्षण मिळते.
कमाईची मोठी संधी
कृषी कंपनीच्या मते, हे तंत्रज्ञान लोकांना रोजगार देण्यासाठीचा एक चांगला मार्ग असू शकतो, कारण त्याचे मार्जिन हे पारंपारिक शेतीपेक्षा अधिक चांगले आहे. कंपनीच्या मते, सामान्य परिस्थितीत आपण एका वर्षामध्ये सहजपणे आपली गुंतवणूक काढून घेऊ शकता. पुढच्या वर्षी त्याची रिटर्न अधिक असेल कारण त्यावेळी आपल्यालाफक्त देखभाल, बियाणे आणि पोषकद्रव्ये यांवर खर्च करावा लागेल. म्हणजेच, आपल्या छतावरील केवळ १५० ते २०० चौरस फूट जागा वापरुन केवळ एका वर्षामध्ये आपली एक लाखांची गुंतवणूक काढून घेत आपण नफा कमवू शकतो.
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com