करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया तर्फे (DLSA Recruitment 2023) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली तर्फे निर्धारित केलेल्या ‘विधी स्वयंसेवक’ सुधारित योजनेअंतर्गत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबतचा तपशिल पुढे देण्यात आला आहे. गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे एकूण 350 विधी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रतीसह दिनांक 7 जुलै 2023 पर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत.
संस्था – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया तर्फे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई
भरले जाणारे पद – विधी स्वयंसेवक
पद संख्या – 350 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जुलै 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – गोंदिया
अर्ज पाठविण्याचा पत्ता – (DLSA Recruitment 2023)
1. गोंदिया व गोरेगाव तालुकाकरीता – मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, विधी सेवा सदन, जिल्हा व सत्र न्यायालय, गोंदिया. पिन क. ४४१६०१.
2. आमगाव व सालेकसा तालुकाकरीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, आमगाव.
3. तिरोडा तालुकाकरीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, तिरोडा
4. देवरी तालूकाकरीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, देवरी.
5. सडक अर्जुनी तालुकाकरीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, सडक अर्जुनी. (DLSA Recruitment 2023)
6. अर्जुनी मोरगाव तालुकाकरीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, अर्जुनी मोरगाव
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. शिक्षक (निवृत्त शिक्षकासह )
2. निवृत्त शासकीय कर्मचारी किंवा जेष्ठ नागरीक
3. एम.एस.डब्लु. विद्यार्थी आणि शिक्षक
4. अंगणवाडी सेविका (DLSA Recruitment 2023)
5. डॉक्टर / चिकित्सक
6. विद्यार्थी/ विधी विद्यार्थी (आजपावेतो विधीज्ञ म्हणून नोंद नसलेले)
7. गैर राजकीय, सेवाभिमुख स्वयंसेवी संस्था आणि क्लबचे सदस्य.
8. महिला अतिपरिचित गटाचे सदस्य, मैत्री संघ आणि उपेक्षित / असुरक्षित गटांसह इतर स्वयं सेवी बचत गट महिला सदस्य.
निवड प्रक्रिया –
1. सदर भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. आलेल्या अर्जाची छानणी केल्यानंतर उमेदवारास मुलाखतीस बोलविण्यात येईल.
3. दाखल अर्जाच्या संख्येनुसार अर्जदारांना मुलाखतीची तारीख स्वतंत्ररित्या मा. जिल्हा न्यायालय, नांदेडच्या
4. संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
काही महत्वाच्या लिंक्स – (DLSA Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – gondia.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com