करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण जगभरात कंपन्यांमधून कर्मचारी कपात (Disney Lay Off) करण्याचा सिलसिला सुरूच आहे. असे असताना आता या यादीत मनोरंजन विश्वातील मोठे नाव समजले जाणाऱ्या डिस्ने कंपनीचा समावेश झाला आहे. डिस्ने कंपनीने आपल्या 3.6 टक्के म्हणजेच 7 हजार कर्मचार्यांना काढून टाकले आहे. कंपनीने या कपातीमागे व्यवसाय फायद्यात आणण्याचा युक्तिवाद केला आहे. कंपनी आपल्या कामाच्या संरचनेची पुनर्रचना करेल, असे सांगण्यात आले आहे. मागच्या काळात ग्राहक कमी झाल्यामुळे कंपनीला झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.
एका रिपोर्टनुसार डिस्ने + हॉटस्टारने 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत 3.8 दशलक्ष सदस्य गमावले. ग्राहकांनी खर्चात कपात केली असून हॉटस्टारच्या स्ट्रीमिंग सेवेच्या ग्राहकांमध्ये गेल्या तिमाहीत प्रथमच घट झाली आहे. असे असले तरीही अहवालानुसार, डिस्ने (Disney Lay Off) ग्रुपने गेल्या तीन महिन्यांत $ 23.5 अब्ज कमाई केली आहे. हा महसूल अपेक्षेपेक्षा चांगला होता, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
डिस्ने हॉटस्टारने कर्मचार्यांना कामावरुन काढल्याबद्दल माहिती दिली; तेव्हा कर्मचाऱ्यांनी ‘हा निर्णय आमच्यासाठी अजिबात सोपा नव्हता आणि कर्मचार्यांच्या प्रतिभेचा (Disney Lay Off) आम्हाला अत्यंत आदर आहे;’ अशी प्रतिक्रिया कंपनीचे सीईओ बॉब इगर यांनी दिली. 2021 या वार्षिक अहवालानुसार, कंपनीने त्या वर्षाच्या 2 ऑक्टोबरपर्यंत जगभरात 1 लाख 90 हजार लोकांना रोजगार दिला. त्यापैकी 80० टक्के पूर्णवेळ कर्मचारी होते.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com