करिअरनामा ऑनलाईन । तामिळनाडूमधील एका छोट्या खेड्यातील व्यक्तीच्या धडपडीची हि कहाणी आहे. एखाद्या व्याक्तीच्या खांद्यावर लवकरच जबाबदारी येऊन पडते आणि त्याला आपले स्वप्न सोडून जबाबदारी उचलावी लागते. अशी एक व्यक्ती आहे ज्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी केली, परंतु, कुटुंबाच्या जबाबदारीने त्यांच्या मार्गात अडचणी निर्माण केल्या.
वडिलांच्या मृत्यूच्या नंतर सर्व सोडून त्याने शेती केली. पण या मोठ्या दु: खाच्या दरम्यान या व्यक्तीने आयएएस बनून त्यांच्या कुटूंबाचे नाव मोठे केले. या अधिकाऱ्याचे नाव एलमबहावत.
त्यांचे वडील प्रशासकीय अधिकारी आणि आई एक शेतकरी. त्यांनी समाजसेवक म्हणूनही काम केले. इतर मुलांप्रमाणेच, एलमबहावत यांचे बालपण अगदी सामान्य होते. त्यांच्या आईवडिलांना नेहमीच अभ्यासाचे खूप महत्त्व होते आणि त्यांच्या मुलाने त्याचा अभ्यास पूर्ण करावा अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे एलमबावत यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. शाळेत शिकत असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
बारावीत शिकत असताना इलमबहावत यांनी वडिलांचे छत्र गमावले. तेव्हापासून त्याच्या घराची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. नंतर त्यांनी घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी शाळा सोडली. शाळा सोडल्यानंतर एलमबहावत यांनी आपल्या आईसह शेतीत काम सुरू केले.
शेती असूनही त्यांच्या घरगुती गरजा पूर्ण झाल्या नाहीत. यात त्यांनी घराच्या गरजा भागविण्यासाठी सरकारी नोकरी करण्याचा विचार केला. आणि त्यांनी कनिष्ठ सहाय्यकासाठी अर्ज केला पण त्यात त्यांना यश आले नाही. एलमबहावत यांच्या म्हणण्यानुसार ते दिवसा शेतात काम करायचे आणि संध्याकाळी नोकरीच्या शोधात सरकारी कार्यालयात जायचे. त्यांचा असा प्रवास सुमारे 9 वर्षे चालला. बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यावर,
दीर्घ अभ्यासानंतर एलमबहावत यांनी मद्रास विद्यापीठातून बीए केले आणि त्यानंतर आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी यूपीएससीची तयारी केली.
गावात नागरी सेवेच्या अभ्यासाची सोय नव्हती. कॉमन लायब्ररीत त्यांनी अभ्यास केला. जेथे नागरी सेवेसाठी स्वतंत्र विभाग होता. गावकरी आणि तमिळनाडू सरकारच्या मदतीने त्यांना विनामूल्य प्रशिक्षण मिळाले. त्यांनी मुख्य परीक्षेत जवळपास 5 वेळा आणि मुलाखतीत तीन वेळा दिली होती. वारंवार अपयशी ठरल्यानंतरही त्यांनी प्रयत्न केले आणि यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. निरंतर प्रयत्नानंतर 2015 मध्ये सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेमध्ये त्यांना 117 वे स्थान मिळाले.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com