करिअरनामा ऑनलाईन । क्लर्क पदावर भरतीची मोठी संधी (DGFT Recruitment 2024) निर्माण झाली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. विदेशी व्यापार महासंचालक अंतर्गत ‘अप्पर डिव्हिजन क्लर्क’ (UDC) पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.
संस्था – विदेशी व्यापार महासंचालक
भरले जाणारे पद – अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC)
पद संख्या – 21 पदे (DGFT Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय अतिरिक्त महासंचालक फॉरेन ट्रेडचे कार्यालय, वाणिज्य विभाग, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, शास्त्री भवन संलग्नक, क्रमांक 26, हॅडोज रोड, नुंगमबक्कम, चेन्नई-600006
वय मर्यादा – 56 वर्षे (DGFT Recruitment 2024)
मिळणारे वेतन – Pay Level-4 in the Pay Matrix (Rs. 25,500/- ते 81,100/-)
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – (DGFT Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.dgft.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com