Devendra Fadnavis : राज्यातील कंत्राटी भरतीचा GR रद्द… देवेंद्र फडणवीसांनी केली घोषणा; तरुणांना मोठा दिलासा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात प्रचंड वादग्रस्त ठरलेला (Devendra Fadnavis) कंत्राटी भरतीचा GR रद्द करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. कंत्राटी भरतीचं पाप हे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांचं आहे; हे पाप आपल्या माथी नको असं सांगत फडणवीस यांनी जीआर रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. राज्य सरकारने आणलेल्या कंत्राटी भरती प्रक्रियेला तरुणांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पत्रकार परिषद घेऊन एक मोठी घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी आजच्या पत्रकार परिषदेत कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्यात आल्याची घोषणा केली आहे. सरकारने  कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्यामुळे राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत, कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. त्याचबरोबर, “कंत्राटी भरतीची सुरुवात काँग्रेसने केली. आता तेच त्याविरोधात आंदोलन करत आहेत, या संदर्भात यांना लाजा का वाटत नाही. हे पाप त्यांचे आहे. त्यांच्या पापाचे ओझे आपल्या सरकारने का उचलावे?” असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला.

2003 मध्ये काढण्यात आला होता GR
यावेळी बोलताना फडणवीस पुढे म्हणाले; “कंत्राटी भरती संदर्भात पहिला जीआर 13 मार्च 2003 रोजी काढण्यात आला. त्यावेळीच्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या सरकारमध्ये कंत्राटी भरती (Contract Recruitment) झाली. नंतर 2010 साली अशोक चव्हाणांनी पहिला जीआर काढला. सहा हजार कंत्राटी पदाचा जीआर (Devendra Fadnavis) काढण्यात आला होता. खरे तर, कंत्राटी भरतीची सुरवातच काँग्रेसने केली होती, आता तेच त्याविरोधात आंदोलन करत आहेत. त्यांच्या पापाचे ओझे आमचे सरकार उचलणार नाही म्हणून कंत्राटी भरती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे;” अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी यावेळी बोलताना दिली.

दरम्यान, राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया सुरु केल्यामुळे त्याला तरुणांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. तसेच, या मुद्द्यावरून राज्यातील अनेक (Devendra Fadnavis) भागात आंदोलन देखील करण्यात आली आहेत. मात्र तरी देखील राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा वेग धरला होता. अखेर आज सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. ज्यामुळे अनेक तरुणांना दिलासा मिळाला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com