करिअरनामा ऑनलाईन । डेक्कन एजुकेशन सोसायटी पुणे येथे लवकरच काही जागांसाठी (DES Pune Recruitment) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2022 असणार आहे.
संस्था – डेक्कन एजुकेशन सोसायटी, पुणे
या पदांसाठी भरती –
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professors CHB Clock Hour Basis)
एकूण जागा – 96 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (DES Pune Recruitment)
- सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professors CHB Clock Hour Basis) –
- उमेदवारांकडे संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किमान 55% गुणांसह किंवा त्याच्या समतुल्य श्रेणीसह पदवी असणं आवश्यक आहे. (SC/ST प्रवर्गासाठी 5% गुणांपर्यंत सूट)
- उमेदवारांचा संपूर्ण कारकिर्दीत चांगला शैक्षणिक अहवाल असणं आवश्यक आहे.
- NET/SET पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. (DES Pune Recruitment)
- पात्रतेसंबंधी इतर सर्व अटी UGC, महाराष्ट्र आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठसरकारने विहित केलेल्या नियमांनुसार आहेत.
- तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- Resume
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो (DES Pune Recruitment)
अर्ज करण्यासाठी पत्ता –
कॉलेज ऑफिस, इनवर्ड सेक्शन, मुख्य ऑफिस, फर्ग्युसन कॉलेज, पुणे : 411004.
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 16 जुलै 2022
सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com