सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सेट परीक्षेची तारीख जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यात अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात येणारी सेट परीक्षा येत्या २७ डिसेंबर रोजी घेतली जाणार असल्याचे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे  २८ जून २०२० रोजी सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोनरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्ववभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.तसेच परीक्षेची तारीख लवकरच कळवले जाईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले होते. त्यानुसार आता ही परीक्षा येत्या २७ डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे.

विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यात अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात परीक्षेबाबतची माहिती  http://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल, असे विद्यापीठातर्फे कळविण्यात आले आहे.

अधिकृत वेबसाईट – http://setexam.unipune.ac

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com