महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी CYDA चा पुढाकार, रोजगाराच्या नवीन संधींसाठी व्हा तयार..!!

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । पुण्यातील सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज (CYDA) या संस्थेतर्फे महिलांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. ८ दिवस ते ३ महिने एवढ्या कालावधीत चालणारी ८ प्रशिक्षण सत्रे CYDA तर्फे आयोजित करण्यात आली आहेत.

केवळ महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये इलेक्ट्रिशियन, मोटारसायकल दुरुस्ती, पेंटर, डिलिव्हरी असिस्टंट, पेट्रोलपंप असिस्टंट, मोबाईल रिपेअरिंग, ड्रायव्हिंग आणि एलईडी दिवे बनवणे यांचा समावेश आहे.

WhatsApp Image 2020-01-23 at 2.12.30 PM

हे पण वाचा -
1 of 227

या प्रशिक्षणातून शिकून बाहेर पडलेल्या मुलींना, महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची किंवा चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटीज तर्फे तरुण आणि महिलांना केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रमांचं आयोजन वर्षभर करण्यात येतं.

दरम्यान महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी 9762472553, 9657996964 या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन CYDA तर्फे करण्यात आलं आहे.

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959  या क्रमांकावर Whatapp  करा आणि लिहा  “HelloJob”

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: