करिअरनामा ऑनलाईन । 12वी बोर्डाची परीक्षा पास झाल्यानंतर (CUET UG 2024) प्रत्येक विद्यार्थी देशातील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये प्रवेशाच्या शर्यतीत सामील होतात. यावर्षी, भारतातील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी CUET UG परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. या परीक्षेसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/CUET-UG वर CUET UG 2024 परीक्षेसाठी नोंदणी (CUET UG 2024 Registration) करू शकता. CUET UG 2024 या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी NIRF रँकिंग (NIRF Ranking) जाहिर केले जाते. या क्रमवारीतून उच्च शिक्षणासाठी कोणत्याही विद्यापीठात प्रवेश घेणे या यादीमुळे सोपे होते. जर तुम्ही CUET UG 2024 परीक्षेची तयारी करत असाल आणि या परिक्षेत तुम्ही चांगले गुण मिळवण्यात यशस्वी झालात, तर तुम्ही भारतातील टॉप 10 पैकी 6 विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरू शकता.
26 मार्चपर्यंत करा अर्ज (CUET UG 2024)
तुम्ही CUET UG 2024 परीक्षेसाठी 26 मार्च 2024 पर्यंत exams.nta.ac.in/CUET-UG वर नोंदणी करू शकता. CUET UG परीक्षा यापूर्वी 15 मे ते 31 मे 2024 या कालावधीत होणार होती. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमुळे हे वेळापत्रक सध्या रद्द करण्यात आले आहे. यूजीसी अध्यक्षांनी सोशल मीडिया आणि नोटीसद्वारे ही माहिती दिली होती. कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा, CUET UG 2024 परीक्षेचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाईल.
भारतातील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये प्रवेश (CUET UG 2024) मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी शर्यत पहायला मिळते. आता बहुतेक विद्यापीठांमध्ये प्रवेश CUET UG 2024 परीक्षेच्या निकालाद्वारे उपलब्ध होईल. पुढे उल्लेख केलेल्या विद्यापीठांना NIRF रँकिंग 2023 मध्ये सर्वोच्च दर्जा देण्यात आला आहे.
1- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc बेंगळुरू)
2- जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU)
3- जामिया मिलिया इस्लामिया (JMI)
4- जाधवपूर विद्यापीठ (CUET UG 2024)
5- बनारस हिंदू विद्यापीठ (BHU)
6- मणिपाल विद्यापीठ
7- अमृता विश्व विद्यापीठम
8- वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT)
9- अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (AMU)
10- हैदराबाद विद्यापीठ
कुठे मिळेल प्रवेश?
CUET UG परीक्षा द्वारे देशातील शीर्ष 10 पैकी 6 विद्यापीठांमध्ये (CUET UG 2024) प्रवेश उपलब्ध होईल. यातील प्रवेशासाठी, तुम्हाला CUET UG नोंदणी फॉर्म भरताना या विद्यापीठांचा पर्याय निवडावा लागेल. JNU (JHU), जामिया मिलिया इस्लामिया, जादवपूर विद्यापीठ, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (AMU), हैदराबाद विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) ही ती 6 विद्यापीठे आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com