करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने CTET जुलै 2024 (CTET Result 2024) परीक्षेचा निकाल प्रसिद्ध केला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकतात. निकालासोबत अंतिम अन्सर की देखील प्रसिद्ध केली आहे.
केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालय यांसारख्या केंद्र सरकारच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या पदावर नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ही केवळ पात्रता परीक्षा आहे. याचा अर्थ भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
सीटीईटी (Central Teacher Eligibility Test) ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. ही परीक्षा CBSE द्वारे घेतली जाते. या परीक्षेचे दरवर्षी दोनवेळा आयोजन केले जाते. CBSE CTET परीक्षेत दोन पेपर असतात. पेपर 1 – पात्रतेसाठी इयत्ता 1 ते 5 च्या शिक्षकांसाठी तर पेपर 2 इयत्ता 6 ते 8 च्या शिक्षकांसाठी आहे.
यावर्षी CTET म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता (CTET Result 2024) परीक्षा ७ जुलै रोजी घेण्यात आली होती. यासाठीची तात्पुरती उत्तरसूची २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तर की वर आक्षेप नोंदवण्यासाठी 27 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली. ही परीक्षा देशातील १३६ केंद्रांवर दोन शिफ्टमध्ये पेन पेपर पद्धतीने घेण्यात आली.
असं डाउनलोड करा प्रमाणपत्र (CTET Result 2024)
CTET प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी, यशस्वी उमेदवारांना DigiLocker पोर्टल digilocker.gov.in किंवा त्याचे मोबाइल ॲप डाउनलोड करून त्यांचा आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांकासह लॉग इन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर, उमेदवार त्यांचे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com