CTET and TET Exam : सरकारी शिक्षक व्हायचंय? द्याव्या लागतात ‘या’ दोन परीक्षा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।  सरकारी शिक्षक (CTET and TET Exam) होण्यासाठी CTET परीक्षेसह संबंधित राज्याची TET परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यानंतरच तुम्ही केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरता. CTET परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार केंद्र सरकारच्या संस्थांमध्ये शिक्षक भरतीसाठी अर्ज करू शकतात. जर तुम्ही शिक्षण क्षेत्रात तुमचे करिअर करण्याचा विचार करत असाल, तर प्रथम त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या तपशीलांची माहिती असणं गजेचं आहे. आज आपण CTET आणि TET या दोन महत्त्वाच्या परीक्षांविषयी माहिती घेणार आहोत.
या दोन परीक्षा काय आहेत हे जाणून घेवूया. तसेच दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही कोणत्या शाळांमध्ये अर्ज करू शकता. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे मिळतील.

1. CTET Exam (CTET and TET Exam)
सर्वप्रथम केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल जाणून घेवूया. या परीक्षेसाठी (CTET and TET Exam) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. ही परीक्षा वर्षातून दोनवेळा जुलै आणि डिसेंबरमध्ये घेतली जाते. ही परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारे घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, तुम्ही केंद्र सरकारद्वारे संचालित नवोदय विद्यालय (NVS), केंद्रीय विद्यालयात शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहात.

2. TET Exam
संबंधित राज्य स्तरावर TET परीक्षा आयोजित केली जाते. राज्य सरकारद्वारे (CTET and TET Exam) चालवल्या जाणाऱ्या सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्तीसाठी करण्यासाठी ही पात्रता परीक्षा घेतली जाते. या अंतर्गत यूपीमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेला यूपी टीईटी म्हणतात. इतर राज्यांनुसार एमपी टीईटी, केरळ टीईटी, टीएनटीईटी परीक्षा घेतल्या जातात. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, उमेदवार राज्य सरकारने जारी केलेल्या शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र होतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com