करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय दलातील भरतीसाठी देशातील (CRPF Recruitment 2024) तरुण पिढी नेहमीच उत्सुक असते. परंतु हे तरूण इंग्रजी आणि हिंदी भाषेत द्याव्या लागणाऱ्या लेखी परीक्षेत मागे पडताना दिसतात. याचा परिणाम म्हणून केंद्रीय दलात नोकरी करण्याचे त्यांचे स्वप्न अर्धवट राहत आहे. याची दखल घेत गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना आता CRPF परीक्षा स्थानिक भाषेत देता येणार आहे. गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळे CRPF परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मराठी भाषेचाही समावेश (CRPF Recruitment 2024)
सध्या देशात केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या कॉन्स्टेबल दलांतर्गत भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत घेण्यात येणारी परीक्षा इंग्रजी, हिंदीसह 13 प्रादेशिक भाषांमध्ये देता येणार आहे. यामध्ये मराठी भाषेचाही समावेश असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, CRPF कॉन्स्टेबल परीक्षेच्या प्रश्नपत्रिका प्रादेशिक भाषांमध्ये तयार केल्या जाणार आहेत. त्यामुळे आता मराठी भाषिक उमेदवारांना मराठी भाषेत पेपर लिहण्याची संधी मिळणार आहे.
या भाषेत देता येणार परीक्षा
कॉन्स्टेबल जीडी परीक्षा स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे घेतल्या (CRPF Recruitment 2024) जाणाऱ्या प्रमुख परीक्षांपैकी एक परीक्षा आहे. या परीक्षेसाठी देशभरातून लाखो उमेदवार बसतात. त्यामुळे या परीक्षेसंदर्भात गृहमंत्रालय आणि कर्मचारी निवड आयोगाने एक सामंजस्य करार केला आहे. या करारात हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, उमेदवारांना मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, तमीळ, तेलगू, उडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी या भाषेत परीक्षा देता येणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com