CRPF Constable Recruitment 2023 : 10 वी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी; तब्बल 1,29,929 जागांसाठी भरती जाहीर, Apply Now

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या सुमारे 1 लाख 30 हजार पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. गृह मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. CRPF द्वारे सुमारे 1,29,929 पदे भरली जाणार असून यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

यातील एकूण जागांपैकी 1,25,262 जागा या पुरुष उमेदवारांसाठी राखीव आहेत तर 4667 महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. १० वी पास उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी crpf.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

 

CRPF ला अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता – केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक (१० वी) किंवा समतुल्य शिक्षण घेतलेले असावे.

वयोमर्यादा काय आहे?
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावी. (अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या बाबतीत वयात पाच वर्षे सूट आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत तीन वर्षे सूट आहे).

निवड प्रक्रिया कशी असेल?
CRPF मधील पदांसाठी उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) साठी विहित केलेली लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. तसेच, माजी अग्निवीरांना पीईटीमधून सूट दिली जाईल.

पगार किती रुपये मिळेल?
कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) साठी 21,700 ते 69,100 रुपये पगार मिळेल.

संस्था – केंद्रीय राखीव पोलिस दल
भरले जाणारे पद – कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
पद संख्या – 1,29,929 पदे
महिला – 4667 पदे
पुरुष – 1,25,262 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
मिळणारे वेतन –  21,700/- ते 69,100/- रुपये दरमहा  पगार मिळणार आहे.
वय मर्यादा – (CRPF Recruitment 2023)
1. 18 ते 23 वर्षे
2. SC आणि ST कॅटेगरीतील उमेदवारांच्या वय मर्यादेत 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
3. ओबीसी उमेदवारांच्या वयोमर्यादेत तीन वर्षाची सूट देण्यात आली आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवारांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. किंवा त्या समकक्ष शैक्षणिक पात्रता असायला हवी. निवड प्रक्रिया –
1. फिजिकल आणि मेडिकल टेस्ट
2. फिजिकल एफिसेन्सी टेस्ट
3. लेखी परीक्षा (CRPF Recruitment 2023)