करिअरनामा ऑनलाईन । नोकरीसाठी अर्ज करताना (Create Resume) तुमचा रेझ्युमे महत्वाची भूमिका बजावतो. आता प्रभावी रेझ्युमे तयार करण्यासाठी तुमची मदत करणार आहे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच AI तंत्रज्ञान. AI च्या मदतीनं दर्जेदार आणि आकर्षक रेझ्युमे बनवण्यासाठी खास उपक्रम कौशल्य विकास मंत्रालयानं सुरु केला आहे. यामाध्यमातून होतकरु तरुणांना डिजिटल रेझ्युमे बनवून मिळणार आहे. याबाबत राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माहिती दिली आहे.
या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा मेसेज
अनेकांकडे चांगला रेझ्युमे नसल्यामुळं नोकरीच्या शोधात असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सॅपीओ अनालिस्टिक्सच्या सहकार्यातून हा उपक्रम कौशल्य विकास विभागाकडून राबवण्यात येत आहे. युवकांना कृत्रिम बुध्दीमत्तेच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे रिझ्युमे तयार करुन देण्यात येणार आहेत. यासाठी 86558 26684 हा क्रमांक देण्यात आला आहे. मंत्रालयानं या व्हॉट्सअप क्रमांकावर Hi असा मेसेज पाठवण्याचं आवाहन उमेदवारांना केलं आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून एक लाखाहून अधिक (Create Resume) युवकांना ही सेवा मिळणार आहे. या रेझ्युमेच्या सहाय्याने त्यांना चांगल्या नोकरीची संधी मिळू शकेल आणि आर्थिक विकासामध्ये त्यांचा महत्वपूर्ण हात भार लागणार आहे; असा विश्वास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला आहे. या नव्या उपक्रमामुळे भरती प्रक्रीया सुलभ होणार असून त्याचा फायदा उमेदवार आणि कंपन्या या दोघांनाही होणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com