करिअरनामा ऑनलाईन । कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल (CISCE Board Results 2024) सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्डातर्फे इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना सोमवारी दि. 6 मे रोजी सकाळी 11 वाजता निकाल पाहता येणार आहे.
CISCE बोर्डाचा निकाल केव्हा जाहीर होणार याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. गेल्या काही दिवसांपासून निकालाच्या खोट्या तारखा व नोटीस सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. त्यामुळे विद्यार्थी व पालक गोंधळून गेले होते. या पार्श्वभूमीवर बोर्डाने आपल्या संकेतस्थळावर 6 मे रोजी निकाल जाहीर केला जाणार असल्याचे अधिकृतपणे प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांना cisce.org किंवा results.cisce.org. या संकेतस्थळावर निकाल पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
CISCE बोर्डातर्फे इयत्ता दहावीच्या परीक्षा 12 मार्चपर्यंत (CISCE Board Results 2024) तर बारावीच्या परीक्षा 3 एप्रिल पर्यंत आयोजित करण्यात आल्या होत्या. परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा होती. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी सुमारे अडीच लाख विद्यार्थी बसले होते. मागील वर्षी 14 मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. मागील वर्षी मुलांपेक्षा मुलींची निकालाची टक्केवारी अधिक होती.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com