Chanakya Niti for Career : करिअरमध्ये यश मिळवायचंय? पहा आचार्य चाणक्य काय सांगतात…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आयुष्यात यशस्वी होण्यासाठी योग्य (Chanakya Niti for Career) मार्गदर्शनाची नितांत गरज असते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीती शास्त्रामध्ये जीवनाशी संबंधीत विविध पैलूंवर भाष्य केले आहे. त्यांनी सांगितलेली धोरणे आजही तंतोतंत लागू होतात. तुम्हाला करिअरमध्ये यश मिळवायचे असेल तर आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. तुमचा यशाचा मार्ग मोकळा करण्यास निश्चितच या गोष्टी मदत करतील.

करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी चाणक्य सांगतात… (Chanakya Niti for Career)
1. व्यक्ती जगात एकटा येतो आणि एकटा जातो. त्यामुळे आपल्या चांगल्या वाईट काळात इतरांकडून मदतीची अपेक्षा ठेवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कार्य करा.
2. कोणतीही व्यक्ती आपल्या जन्माने नाही तर कर्माने महान बनते.
3. कोणतेही कार्य सुरु करण्यापूर्वी स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे.
– मी हे काम का करत आहे?
– या कामाचा परिणाम काय होईल?
– मी यात यशस्वी होईन का?
जर या प्रश्नांची तुमच्याकडे समाधानकारक उत्तरे असतील तरच ते काम सुरु करा; असा सल्ला चाणक्य देतात.

4. कितीही अडचणी आल्या तरी यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. एकदा सुरु केलेले काम अपयशाच्या भीतीने मध्येच सोडू नका. (Chanakya Niti for Career)
5. जर पैसा कमवण्यासाठी तुम्हाला आपला धर्म, नीतिमत्ता सोडावी लागत असेल तर असा पैसा न मिळवलेला चांगला असतो.
6. तुमच्याकडून झालेल्या चुकांमधून धडा घ्या. घडलेल्या गोष्टींचा पश्चात्ताप करण्याऐवजी चुकांमधून शिकून भविष्य सुधारा.

7. कधीच पूर्ण प्रामाणिक किंवा सरळ नसावे. परिस्थितीनुसार डावपेच करता आले पाहिजेत. कारण सरळ झाडच सर्वात आधी कापले जाते.
8. भीतीपासून लांब राहण्यासाठी त्याचा सामना करायला शिका. ज्या गोष्टीची भिती असेल त्यावर मात करता येणं आवश्यक आहे.
9. आपण स्वतः चूक करून त्यातून शिकण्या ऐवजी दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com