करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Exam 2024) चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता बीसीए/बीबीए/बीएमएस/बी. बीएम या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘महा-बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी २०२४ ही सामाईक प्रवेश परीक्षा’ प्रथमच महाराष्ट्र राज्यात घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी येत्या 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या तारखेला होणार परीक्षा (CET Exam 2024)
सीईटी सेलकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार एमबीए इंटीग्रेटेड आणि एमसीए इंटीग्रेटेड या अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ प्रवेशासाठी महा- बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी २०२४ या सामाईक प्रवेशमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता (CET Exam 2024) ज्या उमेदवारांना एमबीए इंटीग्रेटेड आणि एमसीए इंटीग्रेटेड या अभ्यासक्रमाना प्रवेश घ्यावयाचे आहेत, अशा उमेदवारांकरीता महा-बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी २०२४ सामाईक प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. याची सर्व संबंधित उमेदवार/पालक/संस्थांनी नोंद घ्यावी; असं आवाहन करण्यात आलं आहे. महा-बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी २०२४ आणि एमबीए इंटीग्रेटेड आणि एमसीए इंटीग्रेटेड ही सामाईक प्रवेश परीक्षा येत्या 27 ते 29 मे दारम्यान घेतली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com