करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील विविध पदवी (CET Cell Exam Schedule 2024) आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell ) जाहीर केले आहे. त्यानुसार अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची एमएचटी-सीईटी परीक्षा १६ एप्रिल ते २ मे २०२४ दरम्यान होणार आहे. तसेच विधी, एमबीए, नर्सिंग अशा विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य कालावधी सीईटी सेलने अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
सीईटी सेलमार्फत उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण विभागांतर्गत पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा झाल्यानंतर अभियांत्रिकी, विधी यांसह विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे आयोजन सीईटी सेलच्या वतीने करण्यात येते.
२० व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा होणार (CET Cell Exam Schedule 2024)
यंदा ‘सीईटी सेलकडून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील जवळपास २० व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षांमधील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमात केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश दिला जातो. या प्रवेश परीक्षेसह संपूर्ण प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलमार्फत राबविण्यात येते. सीईटी सेलने प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक आधीच जाहीर केल्यामुळे परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. दरवर्षी सुमारे चार लाखांहून अधिक विद्यार्थी ‘एमएचटी सीईटी’ परीक्षेसाठी अर्ज करतात. त्याखालोखाल एमबीए, विधी, एमसीए अशा अभ्यासक्रमांना अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे.
वेळापत्रक पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट –
असे आहे सीईटी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक – शैक्षणिक वर्ष २०२४-२५मधील प्रवेशाकरिता २०२४मध्ये होणाऱ्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक असे असेल…
अभ्यासक्रम : प्रवेश परीक्षेचा संभाव्य कालावधी
1. बी.एड एम.एड (तीन वर्ष इंटीग्रेटेड अभ्यासक्रम)/एम.एड – २ मार्च २०२४
2. एम.पी.एड : ९ ते ११ मार्च
3. एलएलबी (तीन वर्ष) : ११ ते १३ मार्च
4. बी.पी.एड : १५ ते १८ मार्च
5. बी.एड (जनरल, स्पेशल) बी.एड ईएलसीटी : १८ ते २१ मार्च
6. एमबीए/एमएमएस : २३ आणि २४ मार्च
7. एमसीए : ३० मार्च (CET Cell Exam Schedule 2024)
8. बी. डिझाइन : ६ एप्रिल
9. एम.आर्च/एम. एचएमसीटी : ७ एप्रिल
10. बी.एचएमसीटी/बी. प्लॅनिंग : १३ एप्रिल
11. एमएचटी-सीईटी : १६ एप्रिल ते २ मे
12. बी.ए/बी.एस्सी/बी.एड (चार वर्ष इंटीग्रेटेड अभ्यासक्रम) : ६ मे
13. एलएलबी (पाच वर्ष) : ७ आणि ८ मे
14. बी.एस्सी नर्सिंग/एएनएम-जीएनएम : ९ आणि १० मे
15. एएसी/पीजीपी/पीजीओ/ एम.एस्सी (ए ॲण्ड एसएलपी)/एम.एस्सी (पी ॲण्ड ओ) : १२ मे
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com