CDAC Recruitment 2024 : पुण्यात नोकरी!! CDAC अंतर्गत विविध पदावर भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे अंतर्गत (CDAC Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ सल्लागार, सल्लागार पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.

संस्था – प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे
पद संख्या – 18 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जानेवारी 2024
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वरिष्ठ सल्लागार – 01 पद
आवश्यक शैक्षणिक पात्रता – CA/ ICWA
2. सल्लागार -17 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी (CDAC Recruitment 2024) सह इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, फिजिक्स / संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स आणि इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकी पदवीधर / क्वांटम ऑप्टिक्स किंवा क्वांटम कम्युनिकेशनमध्ये पीएच.डी / क्वांटम फिजिक्समध्ये पीएच.डी / बी.ई./बी. टेक./ एम.ई/एम.टेक./ एमसीए / इंग्रजी/मास कम्युनिकेशनमधील प्रथम श्रेणी 60% पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित विषयातील समतुल्य पदवी / पीएच.डी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / एम.ए./ विज्ञानातील कोणताही पदवीधर

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 08 जानेवारी 2024 रोजी 64 वर्षापर्यंत आहे.
परीक्षा फी – फी नाही
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण – Human Resource Department Centre for Development of Advanced Computing Innovation Park, 34, B/1, Panchavati Road, Pune – 411 008.

काही महत्वाच्या लिंक्स – (CDAC Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.cdac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com