CBSE Result 2024 : 10वी,12वीच्या निकालाआधी गुण पडताळणीच्या तारखा जाहीर; जाणून घ्या प्रक्रिया

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE Result 2024) म्हणजेच CBSE चा इयत्ता १० वी आणि १२ वीचा निकाल येत्या 20 मे नंतर जाहीर केला जाईल; असे CBSE बोर्डाने जाहीर केले आहे. आता CBSE बोर्डाकडून आणखीन एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर चौथ्या दिवसापासून आठव्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर जे विद्यार्थी आपल्या निकालाविषयी असमाधानी आहेत आणि ज्यांना गुणपडताळणी करायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने गुण पडताळणीच्या तारखा जाहीर (CBSE Result 2024) केल्या आहेत. सीबीएसईच्या अधिसूचनेनुसार ग्रेडची पडताळणी करण्यासाठी अर्ज करण्याची संधी पाच दिवसांसाठी उपलब्ध असेल. श्रेणीबद्ध उत्तरपत्रिकेची स्कॅन केलेली छायाप्रत निकाल जाहीर झाल्यानंतर 19 व्या दिवसापासून 20 व्या दिवसापर्यंत उपलब्ध असेल. निकाल जाहीर झाल्याच्या तारखेनंतर 24 ते 25 व्या दिवसाच्या दरम्यान उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी उपलब्ध असेल.
बोर्डाचे परिपत्रक https://acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:7ee024a0-1ca5-4aeb-9c8b-875b4c846357 या लिंकवर उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com