करिअरनामा ऑनलाईन । CBSE बोर्डाने 12 वी चा निकाल जाहीर (CBSE Result 2024) केला आहे. यंदाचा निकाल 87.98 टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. या परीक्षेत यावर्षी यंदा 90 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. विद्यार्थी cbse.gov.in किंवा results.cbse.nic.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकतात. मागील वर्षीपेक्षा यावर्षीच्या पासिंग पर्सेंटेशन 0.65 टक्क्याने वाढलेले दिसत आहे. यावर्षीच्या निकालामध्ये 91 टक्केहून अधिक मुली पास झालेल्या आहेत. तर मुलांच्या तुलनेत 6.4 टक्के अधिक मुली पास झालेल्या आहेत.
निकालाची आकडेवारी
CBSE इयत्ता 12वी परीक्षेसाठी यावर्षी 16,33,730 विद्यार्थ्यां नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल 16,21,224 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 14,26,420 विद्यार्थी पास झाले आहेत.
लिंगनिहाय निकाल असा आहे (CBSE Result 2024)
CBSE बोर्डाच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्तीर्ण होण्यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त आहेत. गेल्या वर्षी उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचे प्रमाण 90.68 टक्के होते, त्या तुलनेत यावर्षी या प्रमाणात वाढ झाली आहे. यंदा बारावी सीबीएसई उत्तीर्ण होण्याचे मुलींचे प्रमाण 91.52 टक्के आहे. यावर्षी मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 85.12 टक्के आहे, गेल्या वर्षी हे प्रमाण 84.67 टक्के होते. या परीक्षेत मुलांपेक्षा 6.40 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींनी एकंदरच चांगली कामगिरी केली आहे. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण यंदा 50 टक्के आहे, गेल्या वर्षी हे प्रमाण 60 टक्के होतं.
निकालाची लिंगनिहाय टक्केवारी
1. उत्तीर्ण मुली – 91.52%
2. उत्तीर्ण मुले – 85.12 टक्के%
3. उत्तीर्ण ट्रान्सजेंडर – 50%
1 लाख विद्यार्थ्यांना मिळाले 90 टक्क्यांहून अधिक गुण
यावर्षी परीक्षेत 24,000 हून अधिक विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. 1.16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. यंदा उत्तीर्ण परीक्षार्थी (CBSE Result 2024) होण्याचे प्रमाण 87.98 टक्के आहे. गेल्या वर्षी 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती; ज्यांची एकूण उत्तीर्ण टक्केवारी 87.33 टक्के होती. 2022 मध्ये, एकूण 14,35,366 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 92.7 टक्के होती.
असा पहा निकाल –
1. CBSE इयत्ता बारावीचा निकाल तुम्ही cbse.gov.in किंवा cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकता.
2. प्रथम CBSE बोर्डाच्या 12वी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
3. यानंतर रोल नंबर, शाळा क्रमांक (CBSE Result 2024) आणि प्रवेशपत्र IDमध्ये प्रविष्ट करा.
4. सबमिट करा… आता तुम्हाला CBSE इयत्ता 12 चा निकाल दिसेल.
5. निकाल डाउनलोड करुन त्याची प्रिंट काढून घ्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com