करिअरनामा ऑनलाईन । 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक (CBSE Exam 2024) महत्वाची अपडेट हाती आली आहे. CBSE बोर्डाने 2024 च्या पेपर पॅटर्नमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. विद्यार्थ्यांना हे नवीन पेपर पॅटर्न समजावेत यासाठी बोर्डाने सॅम्पल पेपर्सचा सेट जारी केला आहे. या सॅम्पल पेपर्सच्या मदतीने विद्यार्थ्यांना यावर्षीच्या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि त्यांची मार्किंग स्कीम काय असेल हे सहजपणे कळू शकेल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आपल्या वेबसाईटवर नवीन नमुने जारी केले आहेत. यावेळी सर्वात मोठा बदल म्हणजे आता 50 टक्के प्रश्न कॉम्पिटेन्सीवर आधारित असतील.
येथे पहा नवीन पेपर पॅटर्न
जे विद्यार्थी या वर्षीच्या परीक्षेला बसले आहेत ते अधिकृत वेबसाईटवरून PDF डाऊनलोड करू शकतात. पेपर पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना cbseacademic.nic.in. या वेब साईटला भेट द्यावी लागेल.
असे आहेत नवीन बदल (CBSE Exam 2024)
जर आपण नवीन परीक्षा पद्धतीबद्दल बोललो तर आता अधिक विश्लेषणात्मक संकल्पनेवर आधारित प्रश्न येतील. प्रश्नांची विविधता MCQ, लहान उत्तरे आणि थोडक्यात उत्तरे सारखीच राहतील. जवळपास 50 टक्के प्रश्नांचे MCQ मध्ये रूपांतर करण्यात आले असून त्यांना एक ते दोन गुण आहेत. तुम्ही वेबसाइटवरून नमुना पेपर आणि मार्किंग स्कीम दोन्ही तपासू शकता.
असं करा डाउनलोड
1. नवीन नमुना पेपर डाउनलोड करण्यासाठी, प्रथम cbseacademic.nic.in. या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2. येथे मुख्यपृष्ठावर, प्रश्नावली (Question Bank) नावाचा विभाग शोधा आणि त्यावर क्लिक करा.
3. येथून अतिरिक्त सराव प्रश्नांवर जा आणि क्लिक करा.
4. असे केल्याने एक नवीन पेज उघडेल. या पृष्ठावर तुम्हाला अतिरिक्त सराव प्रश्न दिसतील.
5. विषयानुसार ते येथून डाउनलोड (CBSE Exam 2024) करा आणि तपासा.
6. आता यावेळेस कोणते प्रश्न येतील ते कळेल.
बोर्डाच्या पूर्व परीक्षा काही महिन्यांत सुरू होणार आहेत. ही उत्तम संधी आहे जेव्हा उमेदवार नमुना पेपर डाउनलोड करून नवीन पॅटर्न समजून घेऊ शकत नाहीत तर त्यानुसार तयारी देखील करू शकतात. नवीन माहिती मिळवण्यासाठी वेबसाईटला भेट देत रहा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com