CBSE C-TET Exam 2024 : CBSE च्या C-TET परीक्षेची सिटी स्लिप जारी; अशी करा डाउनलोड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE C-TET Exam 2024) म्हणजेच CBSE ने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी शहर माहिती स्लिप (City Slip) प्रसिद्ध केली आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेले सर्व उमेदवार https://ctet.nic.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे परीक्षा केंद्र तपासू शकतात.

या तारखेला होणार परीक्षा
CTET परीक्षा 7 जुलै 2024 रोजी होणार आहे. परीक्षेचा कालावधी 2:30 तासांचा असेल. दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेतली जाणार असून C-TET पेपर दोनची परीक्षा सकाळी 9.30 ते दुपारी 12 या वेळेत होणार आहे; तर पेपर एकच्या परीक्षेची वेळ दुपारी 2 ते 4:30 अशी निश्चित करण्यात आली आहे. (CBSE C-TET Exam 2024)
CTET पेपर 1 ची परीक्षा इयत्ता 1 ते 5 वी साठी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी घेतली जाईल; तर पेपर 2 ची परीक्षा इयत्ता 6 वी ते 8 वी साठी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी असणार आहे.

अशी डाउनलोड करा सिटी स्लिप (CBSE C-TET Exam 2024)
1. सर्वप्रथम https://ctet.nic.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. CTET परीक्षा सिटी स्लिप डाउनलोड लिंक उघडा. त्यानंतर आपले लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
3. स्क्रीनवर दिसणारी CTET परीक्षा सिटी स्लिप तपासा व डाउनलोड करा आणि भविष्यासाठी हार्ड कॉपीची प्रिंट काढा.

परीक्षेला येताना ‘ही’ कागदपत्रे सोबत ठेवा
परीक्षा केंद्राचे नाव, पेपरची वेळ आणि इतर तपशील C-TET प्रवेशपत्रावर नमूद केले जातील. परीक्षेच्या दिवशी, उमेदवारांनी CTET प्रवेशपत्राची प्रत, एक वैध फोटो ओळखपत्र आणि इतर विहित कागदपत्रे आणणे आवश्यक आहे; अशी सूचना CBSE बोर्डाकडून देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com