CBSC Results 2020 | दहावी, बारावीचे निकाल जाहीर; ‘इथे’ येणार पाहता

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

नवी दिल्ली | CBSE (Central Board of Secondary Education, CBSE) बोर्डाचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. बारावीचे विद्यार्थी CBSE बोर्डाचे निकाल cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत. परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर लागेल. रोल नंबर टाकून निकालाची ऑनलाइन प्रत आपण पीडीएफ स्वरुपात मिळवू शकणार आहात.

आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा निकाल आज (दि. १० जुलै) जाहीर करण्यात आला. आयसीएसई बोर्डातील दहावीच्या परीक्षेला २ लाख ७ हजार ९०२ विद्यार्थी बसले होते. त्यातील २ लाख ६ हजार ५२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजेच दहावीच्या निकालाची टक्केवारी ९९.३३ टक्के इतकी आहे. तर १३७७ विद्यार्थी नापास झाले आहेत. आयएससीच्या बारावीच्या परीक्षेला ८८ हजार ४०९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ८५ हजार ६११ विद्यार्थी पास झाले आहेत. म्हणजेच बारावीचा ९६.८२ टक्के इतका निकाल लागला आहे. आयसीएसई मंडळाच्या cise.org या साईटवर निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना यावर्षी प्रथमच डिजिटल सही असलेले निकालपत्रक मिळणार आहे.