करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, (CAT 2023 Registration) लखनऊ लवकरच कॉमन अॅडमिशन टेस्टसाठी (CAT 2023) अधिसूचना जारी करणार आहे. या परीक्षेसाठी इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यासाठी IIM ची अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in तपासू शकतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), लखनऊ CAT 2023 परीक्षा आयोजित करणार आहे.
इच्छुक उमेदवारांना CAT 2023 परीक्षेसाठी दि. 2 ऑगस्ट 2023 पासून अर्ज करता येणार आहे. दि. 13 सप्टेंबर 2023 पर्यंत ही प्रक्रिया सुरु राहील. CAT 2023 परीक्षा दि. 26 नोव्हेंबर रोजी तीन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे; यासाठी परीक्षेचे प्रवेशपत्र दि. 25 ऑक्टोबरपासून जारी केले जाईल.
ही परीक्षा 155 चाचणी केंद्रांमध्ये आयोजित केली जाईल; यासाठी उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार कोणतीही सहा चाचणी शहरे निवडण्याचा पर्याय दिला जाणार आहे. CAT 2023 ही प्रवेश परीक्षा IIMसह देशभरातील बिझनेस स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी निवडलेल्या उमेदवारांसाठी घेतली जाते. कॅट परीक्षेच्या पद्धतीनुसार या परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असणार आहे. गेल्या वर्षीच्या पॅटर्ननुसार प्रश्न पत्रिकेत एकूण तीन विभाग असतील.
परीक्षेसाठी आवश्यक पात्रता – (CAT 2023 Registration)
1. उमेदवाराकडे किमान 50 टक्के गुणांसह किंवा समान CGPA असलेली UG पदवी असावी.
2. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि अपंग व्यक्ती (PWD) श्रेणीतील उमेदवारांना 45 टक्के पात्रता गुण असणे आवश्यक आहे.
3. जे उमेदवार UG पदवीच्या अंतिम वर्षासाठी किंवा समकक्ष पात्रता परीक्षा देत आहेत, ज्यांनी पदवी पूर्ण केली आहे आणि निकालाची वाट पाहात आहेत ते या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
नोंदणी फी –
CAT 2023 परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी, उमेदवारांना SC, ST आणि PwD श्रेणीतील उमेदवारांसाठी 1200/- रुपयांचे नोंदणी शुल्क तर इतर (CAT 2023 Registration) सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी 2400/- रुपये भरावे लागतील .
कसा करायचा अर्ज –
1. सर्वप्रथम IIM ची अधिकृत वेबसाईट iimcat.ac.in ला भेट द्या.
2. त्यानंतर येथील मुख्यपृष्ठावरील CAT 2023 नोंदणीवर क्लिक करा.
3. युनिक युजर आयडी आणि पासवर्ड तयार करण्यासाठी नोंदणी करा.
4. अर्ज भरण्यासाठी जनरेट केलेला युजर आयडी (User ID) आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com