‘CAT 2020’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । कॉमन अॅडमिशन टेस्ट 2020 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. देशातील 20 IIM मधील MBA / PGDM अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेचे आयोजन भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) 29 नोव्हेंबर 2020 रोजी  करणार आहे. पदवीधर उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

अधिकृत वेबसाईट – iimcat.ac.in

 या वेळापत्रकानुसार परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 16 सप्टेंबर आहे. कॅट परीक्षेचे अॅडमिट कार्ड 28 ऑक्टोबरपासून परीक्षेच्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना डाऊनलोड करता येईल.

वेळापत्रकानुसार कॅट परीक्षेचा निकाल जानेवारी 2021 च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो. कॅट परीक्षेचे आयोजन कोविड -19 महामारी लक्षात घेऊन त्यानुसार केलं जाईल. परीक्षेच्या संकेतस्थळावर दिलेल्या सूचना या केंद्र व राज्य सरकार आणि कॅट समूहाद्वारे वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार बदलूही शकतात. त्यामुळे उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे –

नोंदणी सुरू होण्याची तारीख- 5 ऑगस्ट 2020 (सकाळी 10 वाजता)

हे पण वाचा -
1 of 205

नोंदणीची अखेरची मुदत – 16 सप्टेंबर 2020 (सायंकाळी 5 वाजता)

अॅडमिट कार्ड जारी होण्याची तारीख- 28 ऑक्टोबर 2020

कॅट परीक्षेची तारीख- 29 नोव्हेंबर 2020

परीक्षेचा निकाल – जानेवारी 2021 च्या दुसऱ्या आठवड्यात

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: