Career Tips : करिअर निवडताना गोंधळू नका; ‘या’ 8 टिप्स फॉलो करा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना करिअरसाठी (Career Tips) योग्य क्षेत्र निवडणे हा प्रत्येकासाठी कठीण निर्णय ठरतो. कोणत्या क्षेत्रात जावे, कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, कोणता कोर्स करणे त्यांच्यासाठी चांगले असेल, जेणेकरून त्यांना चांगली नोकरी मिळेल याचा विचार सतत येत असतो. हा विचारांचा गोंधळ टाळण्यासाठी करिअर निवडताना काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही करिअरची योग्य निवड करू शकाल आणि तुम्हाला यश मिळेल.

1. स्वतःची क्षमता ओळखा 

करिअर निवडण्याच्या बाबतीत कोणीही येऊन आपल्याला सल्ला देत असतात. पण उमेदवारांनी यापासून दूर राहावे. या गोष्टी करिअरच्या निवडीमध्ये अडथळा आणू शकतात. केवळ (Career Tips) तज्ञांचे मार्गदर्शन आपल्याला उपयोगी पडेल. याशिवाय स्वत:ची योग्यता, क्षमता आणि आवड लक्षात घेऊन करिअरचा पर्याय निवडा.

2. तज्ञांचा सल्ला घ्या (Career Tips)

करिअर निवडण्यापूर्वी तज्ञाची मदत घ्या. त्यांच्याशी बोलल्याने तुम्हाला वस्तुस्थितीची माहिती मिळेल आणि भविष्यात याचा फायदा होईल. यामुळे मनात येणारे सर्व प्रश्न सुटतील आणि क्षेत्र निवडीतील अडचणी टाळता येतील आणि त्याचबरोबर तुम्हाला स्पष्ट ध्येय घेऊन पुढे जाता येईल.

3. व्यक्तिमत्वाततील ‘या’ गोष्टी विकसित करा

करिअर करताना तुमचे व्यक्तिमत्त्व खूप महत्त्वाची भूमिका बजावते. अभ्यासानंतर एका पातळीवर येताना, व्यक्तिमत्वातील सर्जनशील विचार, निर्णय घेण्याची क्षमता, सकारात्मकता, संवाद कौशल्य, गोष्टी समजून घेण्याची कला इ. कौशल्ये महत्वाची भूमिका बजावतात. करिअर निवडण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी हे आवश्यक आहेत.

4. निर्णयावर ठाम रहा

करिअर निवडताना तुमचा निर्णय आणि आवड याबाबत पूर्णपणे तटस्थ राहा. स्वतःची मानसिक तयारी करा. अभ्यासक्रम किंवा क्षेत्र निवडीसाठी घेतलेला निर्णय (Career Tips) पुन्हा पुन्हा बदलू नका. करिअरचा निर्णय विचारपूर्वक घ्या. यामुळे वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जाण्यापासून वाचेल.

5. दूरदृष्टि ठेवा 

आगामी काळात कोणते क्षेत्र अधिक चांगल्या संधी देऊ शकते याची तपासणी करा. भविष्यात पैसा आणि छंद दोन्ही पूर्ण करता येतील, असे करिअर ऑप्शन पाहा. संबंधित क्षेत्रात जे काम करत आहेत त्यांच्याशी बोला.

6. अनुभवी लोकांचा सल्ला घ्या 

तुम्ही ज्या क्षेत्रात कोर्स करत आहात त्या क्षेत्रातील लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. यातून अभ्यासक्रमाशी संबंधित माहिती मिळते. दुसरीकडे, अनुभवी लोकांकडून करिअरसाठी चांगले मार्गदर्शन मिळेल.असे लोक भविष्यातही मदत करू शकतात.

7. आत्मविश्वास बाळगा (Career Tips)

आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे असे म्हणतात. तुमचा आत्मविश्वास दृढ नसेल, तर तुमच्याकडे कितीही माहिती असली तरी तुम्ही नोकरीत चांगली कामगिरी करू शकणार नाही. त्यामुळे आत्मविश्वास मजबूत ठेवा, त्याचा फायदा नोकरीत नक्कीच होतो.

8. सर्व परिस्थिती स्वीकारा

करिअर निवडताना कोणत्या वातावरणात काम करता येईल याकडे लक्ष द्या. याशिवाय नोकरीची संधी, नोकरीची सुरक्षा काय आहे, किती पगार मिळतो याकडे लक्ष द्या. नोकरीत (Career Tips) तुम्ही स्वतःला किती व्यवस्थित करता येईल, या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com