Career Success Story : शिक्षण अवघं 8 वी… सोशल मीडियातून ‘हा’ तरुण करतोय लाखोंची कमाई, वाचा एका जिद्दीची कहाणी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। सध्या सोशल मिडियाचा जमाना आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सोशल (Career Success Story) मिडियाद्वारे अनेकांनी आपले करिअर सेट केले आहे. अनेकांनी सोशल मिडियाचा वापर करून नाव तर कमावले आहेच पण ही लोकं या माध्यमातून भरपूर कमाई देखील करत आहेत. हलाखीच्या परिस्थितीत जेमतेम आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील मच्छिंद्र राजाभाऊ झाडे यांनी देखील सोशल मिडियाच्या माध्यमातून आपले नाव कमावले आहे. ‘उसातली भानगड’ या वेब सीरिजची त्यांनी निर्मिती केली असून सोशल मिडियावर या वेब सीरिजने धुमाकूळ घातला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातून दिग्दर्शक, कथाकार, कलाकार संकलक म्हणून नावारूपाला आलेले मच्छिंद्र राजाभाऊ झाडे यांच्या जीवन प्रवासात खूप अडथळे आले आहेत. युट्युबवर तुम्ही उसातली भानगड ही वेब सिरीज कधी ना कधी तर पाहिली असेलच. या वेब सिरीज मधील सुरज्या नावाचं पात्र अनेक प्रेक्षकांना आपल्या अभिनयातून आकर्षित करतं आहे. सुरज्या या पात्राच खरं नाव हे मच्छिंद्र राजाभाऊ झाडे. मच्छिंद्र झाडे हे या वेब सीरिजचे सर्वस्व आहेत. जसे की लेखक, दिग्दर्शक, कथाकार, अभिनेता त्यासोबतच एडिटर, छायांकन अशा सर्वच महत्त्वाच्या जबाबदारी ते स्वत:हून सांभाळतात.

उसातली भानगड ही वेब सिरीज सध्या महाराष्ट्रातील लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. यामधील अस्सल गावखेड्यातील कलाकार काम करत असल्याने त्यांचा नैसर्गिक अभिनय या वेब सीरिजच्या कथेला खरेपणाचे रूप मिळवून देतो. या अगोदर उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक वेब सीरिजचे शूटिंग झाले. त्यामध्ये आगाऊ चांडाळ चौकडीच्या आगाऊ करामती ही उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिली वेब सिरीज होती. त्यानंतर करामती कार्टी, तेरणा काठची पोरं या इतर वेब सीरिजला प्रेक्षकांची मने जिंकता आली नाहीत. त्यामुळे या वेब सीरिजचे शूटिंग बंद पडले. मात्र उसातली भानगड या जिल्ह्यातील एकमेव वेब सीरिजला लाखो प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

असा होता प्रवास (Career Success Story)

उसातली भानगड या वेब सीरिजचे दिग्दर्शक मच्छिंद्र झाडे यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. मच्छिंद्र हे अवघ्या चार वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे घरची सर्व जबाबदारी मच्छिंद्र यांच्या आई शोभा राजाभाऊ झाडे यांच्या खांद्यावरती आली. मच्छिंद्र यांचे पहिली व दुसरीचे शिक्षण त्यांच्या मुळगावी झाले. नंतरचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी वाशी गाठली. वाशीत सरकारी शाळेत त्यांनी फक्त दोन वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी 5 वी नंतरच्या शिक्षणासाठी जिल्ह्याचे ठिकाण गाठले. उस्मानाबाद या ठिकाणी त्यांनी 5 वी ते 8 वी पर्यंतचे शिक्षण घेतले.

हर तऱ्हेची कामं केली 

आठवी नंतर मच्छिंद्र यांना शिक्षणात रस राहिला नाही. घरी आईला काहीच न कळवता काम करण्यासाठी त्यांनी पुणे गाठले. अनोळखी शहरात पाय रोवताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. हाताशी काही काम नसल्याने काही महिने त्यांनी म्हशी पाळण्याचे काम केले. नंतर त्यांना पुण्यातील एका नातेवाईकांबद्दल समजले. आता त्यांनी त्याच्याकडे काम करण्याचे ठरविले. नातेवाईकांकडे पोहोचल्यानंतर त्यांना समजले की इथे कचरा वेचण्याचे काम आहे. तोंडाला रुमाल बांधून मच्छिंद्र यांनी कामाला सुरुवात केली. जवळपास एक वर्षे त्यांनी कचरा वेचण्याचे काम केले. नंतर वयाच्या 19 व्या वर्षी घरच्यांनी त्यांचे लग्न केले. लग्नानंतर मच्छिंद्र एका हॉटेलवरती वेटर म्हणून काम करू लागले. यावेळी त्यांनी कायम वेटर म्हणून काम करायचे ठरविले.

अशी निर्माण झाली सिनेमाची आवड

2016 साली नागराज मंजुळे यांच्या सैराट या सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. सैराट सिनेमा पाहण्यासाठी मच्छिंद्र यांनी हॉटेल मालकांकडून उचल घेऊन उस्मानाबाद, बार्शी, बीड याठिकाणी प्रवास केला. मात्र त्यांना हा सिनेमा लवकर पहायला मिळाला नाही. आठ दिवसानंतर जेंव्हा त्यांनी सैराट पाहिला तेव्हा त्यामधील अभिनय पाहून (Career Success Story) मच्छिंद्र यांनी अभिनय करायचे ठरविले. वेटर म्हणून काम करत असताना मच्छिंद्र अभिनय करायचे. सिनेमे पाहत असताना त्यांना चित्रपट सृष्टीचं आकर्षण वाटू लागले. यामधून त्यांना विचार आला की आपल्या आयुष्यातील वास्तव लोकांसमोर मांडायला हवे; आणि या विचारातून प्रेरणा घेत त्यांनी लघुचित्रपट सृष्टीकडे आपला मोर्चा वळवला. त्यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारचे शिक्षण घेतलेले नाही. त्यांनी प्रथमच यूट्युबवर सैराट चा एक व्हिडीओ आपल्या पद्धतीने बनविला. त्या व्हिडिओला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला.

अशी झाली वेब सीरिजची निर्मीती

मच्छिंद्र यांना व्यायामाची खूप आवड आहे. आपल्या पहिल्या व्हिडिओला प्रेक्षकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून त्यांनी व्यायामाचे व्हिडीओ युट्युबवर अपलोड करायला सुरूवात केली. या व्हिडीओला प्रेक्षकांचा हवा एवढा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी गावातील काही कलाकारांना सोबत घेऊन वेब सीरिजची निर्मिती केली. आजच्या घडीला ही वेब सिरीज संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य करत आहे.

युट्युबवरून अशी होते कमाई

जेंव्हा एखादी व्यक्ती युट्युबवर व्हिडीओ अपलोड करते तेंव्हा त्या व्यक्तिला एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार तास वॉच टाइम 12 महिन्यांच्या आत पूर्ण करावा लागतो. असा युट्युबचा नियम आहे. हे सर्व पूर्ण केल्यानंतर अॅडसेन्स अकाऊंट मध्ये डॉलरच्या रुपात रक्कम जमा होते. भारतीय चलनानुसार चलन बदलून ती रक्कम प्रत्येक महिन्यातील 24 तारखेला संबंधित व्यक्तिच्या खात्यात जमा होते. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून मच्छिंद्र झाडे लाखोंची कमाई करत आहेत.

मच्छिंद्र यांचा हा प्रवास शहरी आणि ग्रामीण भागातील होतकरू तरुणांना निश्चितच प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या जिद्दीवरून हे लक्षात येते की, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर फक्त पुस्तकी ज्ञान घेऊन उपयोग नाही. यश मिळवण्यासाठी व्यावहारिक ज्ञान असणं ही तितकेच गरजेचे आहे. जिद्द, चिकाटी आणि योग्य नियोजनाच्या बळावर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यश खेचून आणू शकता हे निश्चित.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com