Career Success Story : नोकरीचा नादच नाही केला!! हायटेक शेती करुन करते लाखोंची कमाई

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे (Career Success Story) राहणारी 27 वर्षीय अनुष्का जी जैस्वाल (Anushka Jaiswal) हिने दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे, परंतु इतरांप्रमाणे तिला नोकरी करायची नव्हती… वेगळे काहीतरी करण्याच्या नादातून तिने भाजीपाला शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आज ती वर्षाला तब्बल 45 लाख रुपये कमावत आहे.

अलिकडच्या काळात तरुण शेतकरी शेतीमध्ये विविध प्रयोग (Career Success Story) करताना दिसतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन भरघोस उत्पादन घेतात. पुरुषांच्या बरोबरीनं महिला देखील शेतात काम करतात. भाडेतत्वार जमिन घेऊन भरघोस उत्पादन घेणाऱ्या एका तरुणीची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत. अनुष्का जैस्वाल असं तिचं नाव असून, तिनं तिच्या शेतात पिकवलेल्या भाज्या लखनऊच्या सर्व मार्केट आणि अनेक मोठ्या शॉपिंग मॉल्समध्ये विकल्या जातात. यातून अनुष्का जैस्वाल वार्षिक 45 लाख रुपयांचा नफा मिळवत आहे.

दिल्ली विद्यापीठातून घेतले शिक्षण (Career Success Story)
अनुष्का दिल्ली विद्यापीठातून (Delhi University) उत्तीर्ण झाली आहे. यानंतर नोकरीच्या मागे न धावता तिने यशस्वी शेती सुरु केली आहे. यातून ती मोठा नफा मिळवत आहे. उत्तर प्रदेशातील महिला आता पुरुषांच्या बरोबरीने विविध व्यवसायात बाजी मारत आहेत. मग ते शिक्षण क्षेत्र असो, शेती असो वा कोणतेही क्षेत्र असो. आज महिला प्रत्येक क्षेत्रात नाव कमावत आहेत. यापैकीच एक तरुणी आहे अनुष्का जैस्वाल….

वयाच्या 23 व्या वर्षी सुरु केली शेती
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील अनुष्का जयस्वाल या तरुणीने चांगला अभ्यास करुन शिक्षण पूर्ण केले; पण शिक्षणानंतर नोकरी करण्याऐवजी तिने शेतीचा मार्ग (Career Success Story) निवडला. आज ती दरमहा 2 लाख रुपयांहून अधिक नफा कमावत आहे; 20 हून अधिक लोकांना तिने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. वयाच्या 23 व्या वर्षी शेती करायला सुरुवात केली आणि आता ती 27 वर्षांची आहे. आज ती वार्षिक 45 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा कमावत आहे.

भाड्याने जमीन घेवून पॉली हाऊस उभारले (Career Success Story)
2021 मध्ये अनुष्काने लखनऊच्या मोहनलालगंज भागात असलेल्या सिसेंडी गावात एक एकर जमीन भाडेतत्वार घेऊन शेती करायला सुरुवात केली. दिल्लीच्या हिंदू कॉलेजमधून तिने अर्थशास्त्राचे शिक्षण घेतलं आहे. कृषी क्षेत्रातील शिक्षण न घेवून सुध्दा तिने शेती करण्याचं धाडस करुन दाखवलं आहे; कारण आपण काहितरी वेगळं करायचं असं तिने ठरवलंच होतं. सरकारकडून मदत घेऊन तिने एक एकरावर पॉली हाऊस सुरु केले. आता ती आणखी 6 एकर शेती करत आहे. जिथे सिमला मिरची, कोबी, फ्लॉवर आणि इतर अनेक भाज्या पिकतात. यातून तिला भरपूर नफाही मिळत आहे.

शेतीत नक्की काय करते अनुष्का (Career Success Story)
कमी जमिनीतही अधिक उत्पादन कसे घेता येईल; हे अनुष्काने दाखवून दिले आहे. परिस्थिती अशी होती की एका एकरात 50 टन इंग्रजी काकडीचे उत्पादन होते. तर लाल पिवळी भोपळी मिरचीचे पीक 35 टन होते. एवढेच नाही तर बाजारात सिमला मिरचीला दर चांगला मिळत आहे. लखनौच्या सर्व बाजारपेठांमध्ये आणि अनेक मोठ्या शॉपिंग मॉल्समध्ये त्यांच्या शेतात पिकवलेल्या भाज्यांना मोठी मागणी आहे. आता महिला शेतकरी अनुष्का जयस्वालची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. विशेष म्हणजे ही महिला शेतकरी सेंद्रिय पद्धतीने (Career Success Story) हिरव्या भाज्यांची लागवड करते. तिला फलोत्पादन विभागाकडून ‘ड्रॉप मोअर पीक’ अंतर्गत 90 टक्के अनुदान मिळाले आहे. त्यामुळं भाजीपाला लागवडीचा खर्च खूपच कमी आहे. त्यामुळं आम्ही आमच्या पिकांवर अधिक लक्ष देऊ शकलो; असं ती सांगते.

अशी केली सुरुवात
अनुष्काच्या कुटुंबाला कसलीही शेतीची पार्श्वभूमी नाही. त्यांच्याकडे वडिलोपार्जित जमीनही नव्हती. अशा परिस्थितीत अनुष्काने मोठे धाडस केले. तिने प्रथम एक एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली. यातून नफा मिळवल्यानंतर तीन एकर जमीन घेतली. त्यानंतर योग्य प्रशिक्षण घेऊन शेती करण्यास सुरुवात केली. तिच्या शेतात (Career Success Story) पिकवलेल्या भाज्या लखनऊच्या सर्व मार्केट आणि अनेक मोठ्या शॉपिंग मॉल्समध्ये विकल्या जातात. त्यामुळे तिला सातत्याने नफा मिळत आहे. आपल्या कुटुंबाविषयी बोलताना अनुष्का सांगते; “माझे वडील व्यापारी आहेत आणि आई गृहिणी आहे. तर माझा भाऊ पायलट आहे, बहीण वकील आहे. वहिनी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत; आणि मी शेती करते आणि अनेक गरजूंना रोजगार देते.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com