करिअरनामा ऑनलाईन । इंदापूरची सिमरन थोरात ही तरुणी… हिचा प्रेरणादायी (Career Success Story) प्रवास ऐकल्यावर जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही स्वप्न साकार करता येते; याची प्रचिती येते. समाजामध्ये असे अनेक ध्येयवेडे तरुण आहेत जे स्वतः बरोबर आई-वडीलांचे स्वप्न साकार करण्यासाठी कोणतीही तडजोड करु शकतात. यापैकीच एक आहे सिमरन थोरात (Simran Thorat Deck Officer). तिच्या आई-वडीलांनी अपार कष्ट करुन तिला शिकवले. तिने देखील रात्रीचा दिवस करून आपल्या पालकांच्या कष्टाचं चीज केलं आणि तिने पुणे जिल्ह्यातील पहिली महिला मर्चंट नेव्ही ऑफिसर होण्याचा बहुमान पटकावला.
लहानपणीच ठरवलं होतं
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एका छोट्याशा गावातील सिमरन… लहानपणीच तिने समुद्राच्या लाटांवर स्वार होण्याचे स्वप्न पाहिले आणि मोठेपणी ते पुर्णही केले. मात्र हा प्रवास (Career Success Story) तिच्यासाठी सोपा नव्हता. मर्चंट नेव्हीमध्ये स्थान मिळवायचे आणि तेही एका महिलेने ही गोष्ट नक्कीच आव्हानात्मक आहे. तरीही ती हरली नाही. असंख्य अडचणींवर मात करत तिने आपली वाटचाल ध्येयापर्यंत पोहचवली.
आई-वडिलांनी शेती विकण्याचा निर्णय घेतला (Career Success Story)
सिमरनच्या घरची परिस्थिती तशी बेताची होती. मर्चंट नेव्हीतील शिक्षणासाठी भरपूर पैसा लागतो. मर्चंट नेव्हीमध्ये सामील होण्यासाठी तीन वर्षाचा कोर्स करावा लागतो. या कोर्सची फी 9 लाखाच्या पुढे आहे. यासोबत इतर खर्च आहेतच. सिमरनचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत. वडिलांनी मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होती नव्हती तेवढी शेती विकून टाकली. त्याानंतर आईने एका फॅक्टरीत तर वडिलानी इलेक्ट्रशियनचे काम करत कुटुंबाचा खर्च चालवला. मुलीला लागेल तेव्हा, लागेल तेवढा पैसा पुरवला. तिने देखील या सर्व गोष्टींची जाणीव ठेवून ‘पुणे जिल्ह्यातील पहिली महिला मर्चंट नेव्ही ऑफिसर’ होण्याचा मान मिळवला.
शिक्षणामध्ये भाषेचा अडसर
आपल्या प्रवासा बद्दल बोलताना सिमरन सांगते की; शिक्षणामध्ये (Career Success Story) येणारे आर्थिक अडथळे आई वडिलांच्या कृपेने दूर झाले. मात्र प्रत्यक्ष शिक्षण घेत असताना काही भाषेशी संबंधित अडचणी आल्या. माझं प्राथमिक शिक्षण केवळ मराठी माध्यम आणि त्यानंतर सेमी इंग्रजीत झालं आहे. मर्चंट नेव्हीचा संपूर्ण इंग्रजी भाषेत असलेला अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणे हे माझ्यासाठी आव्हानच होते. तरीही मी कठोर मेहनत करुन हा कोर्स पूर्ण केला.”
तासनतास इंग्रजी बोलण्याचा सराव केला (Career Success Story)
कोर्स पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळवताना तिच्या समोर आव्हाने उभी होती. या आव्हानांपासून ती लांब पळाली नाही. ती सांगते; “मी माझ्या बॅचमधील इतर मुलींप्रमाणेच गुणवत्ताधारक विद्यार्थीनी होते. पण सुरुवातीच्या प्लेसमेंट फेरीत मला नाकारण्यात आले. माझे इंग्रजी अस्खलित नसल्यामुळे मला एका मोठ्या शिपिंग कंपनीतील नोकरी नाकारली गेली. मी निराश झाले, पण त्यातूनही स्वतःला सावरत आणखी मेहनत घेण्याचा निर्णय घेतला. मी भावाशी फोनवर इंग्रजीत बोलू लागले. आरशासमोर उभी राहून तासनतास इंग्रजी बोलण्याचा सराव केला. अखेरच्या वर्षात सीस्पॅन कंपनी जेव्हा प्लेसमेंटसाठी आली, तेव्हा त्यांनी माझी महिला डेक कॅडेट म्हणून निवड केली. याआधी सीस्पॅन कंपनीत एकाही महिलेने काम केलेले नाही; तिथे माझी निवड झाली.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com