करिअरनामा ऑनलाईन । कराड तालुक्यातील चरेगाव येथील (Career Success Story) विसापूरे हे कुटुंब आज अचानकच चर्चेत आलं ते ह्या कुटुंबातील तरुणामुळे. कठोर मेहनतीने 26 वर्षीय शिवम विसापूरे याने थेट पोलिस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली आहे. त्याने मिळवलेल्या यशामुळे आज सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
एका खोलीत सर्व कुटुंब
कराड तालुक्यातील चरेगाव येथील विसापूरे हे सर्वसाधारण कुटूंब. या कुटुंबाला अवघी एक गुंठाही शेतजमीन नाही. हे कुटूंब ज्या घरात राहत होते, ते घर म्हणजे बाहेरच्या खोलीत चटणी करण्याचा डंक व आतील एका खोलीत संपूर्ण कुटूंब. अशा हलाखीच्या परिस्थिती शिवम आणि त्याचे कुटुंब राहत (Career Success Story) होते. कुटूंबाची आर्थिक प्रगती होण्यासाठी शिवमची आई छाया विसापुरे या आशा सेविका म्हणूनही काम करायच्या. तसेच शाळेत शालेय पोषण आहार देखील तयार करण्यासाठी त्या जात असत. शिवम चे वडिल दत्तात्रय विसापूरे यांनी तासवडे एम.आय.डी.सी मध्ये नोकरी केली. काही काळ त्यांची नोकरी ही गेली. त्यावेळी आईने संपूर्ण संसाराची जबाबदारी खांद्यावर घेत संसाराचा गाडा ओढला. प्रामाणिक प्रयत्न व जोडीला कष्ट असले तर दिवस बदलतात. हे डोक्यात ठेऊन या कुटूंबाने आर्थिक प्रगती केली.
इंजिनिअरिंग नंतर दिली MPSC (Career Success Story)
शिवम शाळेपासूनच हुशार व जिद्दी होता. यामुळे विसापुरे दाम्पत्याने ठरवले की, काहीही झाले तरी शिवमला शासकीय अधिकारी बनवायचेच. त्याचा लहान भाऊ अक्षयने वडिलांना कामात मदत करत त्याचा मोठा भाऊ शिवमला यश मिळवण्यासाठी मदत केली. याच दरम्यान, शिवमचे लग्न केले. पत्नी पुजानेही शिवमला सहकार्य केले. पुण्यात राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी (Career Success Story) सुरू केली. पहिल्या प्रयत्नात अपयश आले. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात शिवम नायब तहसीलदार बनला. तिसऱ्या प्रयत्नात पोलीस उपअधीक्षक झाला. शिवमने प्राथमिक शिक्षण चरेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल मध्ये घेतले. कराडच्या शासकीय अभियांत्रिकी कॉलेज मधून त्याने मँकेनिकल इंजिनिअरिंगमधून डिप्लोमा पूर्ण केले आणि नंतर पुणे येथील कॉलेज मधून मँकेनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com