Career Success Story : मुंबईची झोपडपट्टी ते मायक्रोसॉफ्ट एम्प्लॉई; भेटा शाहिना अत्तरवाला या संघर्षयोद्धा महिलेला

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । शाहिना 14 वर्षांची असताना तिचे वडील (Career Success Story) घरोघरी बांगड्या विकून घर चालवत असत. परंतु वडील आजारी पडल्याने घराचे भाडे देणेही कठीण झाले आणि संपूर्ण कुटुंबाला नातेवाईकांसोबत रस्त्याच्या कडेला फूटपाथवर राहावे लागले. शाहीनाच्या घरची आर्थिक परिस्थिती अशी झाली होती की, प्रयत्न करूनही तिचे वडील तिला संगणक अभ्यासक्रमासाठी पैसे देऊ शकले नाहीत. अशा स्थितीत शाहिनाने एक वेळचे जेवण बंद केले. तिने पायीच शाळेत जायला सुरुवात केली, जेणेकरून तिला प्रवासाचे भाडे वाचवता येईल.

प्रबळ इच्छाशक्ती आणि कष्ट सोसण्याची इच्छा यामुळे प्रत्येकाला यश मिळू शकते. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो. आज आपण एका स्ट्रगलर तरुणीची यशोगाथा पाहणार आहोत. शाहिना अत्तरवाला (Shahina Attarwala) असं या तरुणीचं नाव आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या (Career Success Story) शाहिनाने डिझायनिंगच्या क्षेत्रात स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. शाहिना आता मायक्रोसॉफ्टसह विविध कंपन्यांमध्ये काम करते. फुटपाथ ते मायक्रोसॉफ्टसारख्या (Microsoft) नामांकित कंपनीत नोकरी मिळवण्या पर्यंतचा तिचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. जाणून घेवूया तिच्या संघर्षाविषयी…

पैसे बचत करुन सेकंड हँड कॉम्प्युटर घेतला
शाहीनामध्ये शिकण्याची जिद्द होती. परिस्थितीवर मात करुन थोडे पैसे वाचवून शाहीनाने कॉम्प्युटरचा अभ्यास सुरु केला. तिच्या वडिलांनीही इतरांकडून काही पैसे उसने घेतले आणि (Career Success Story) शाहिनासाठी सेकंड हँड संगणक आणून दिला. यासोबतच शाहिनाने मुंबई विद्यापीठातून ग्रॅज्युएशनही चांगल्या गुणांनी पूर्ण केले आणि त्यानंतर एनआयआयटीमधून व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि डिझाइनचा कोर्स केला. येथून शाहिनाचे नशीब बदलू लागले.

शालेय वयापासूनच प्रोजेक्ट बनवायला सुरुवात केली (Career Success Story)
शाहिनाने लहानपणापासून गरिबी आणि अनेक संघर्षांचा सामना केला आहे. शालेय जीवनापासून ती विविध प्रकारची उत्पादने डिझाइन करत असे. पुढे डिझायनिंगचा व्यावसायिक अभ्यासक्रम केल्याने तिच्या सर्जनशीलतेला नवी दिशा मिळाली. याचा फायदा असा झाला की तिला मुंबईतील कार एक्स्पोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. बंगळुरूमध्ये झूमकार लॉन्च करताना तिने बनवलेल्या स्कूटरच्या डिझाइनला पसंती मिळाली. स्कूटीच्या एका मॉडेलमुळे शाहिनाला बेंगळुरूमध्ये वेगळी ओळख मिळाली आहे. याशिवाय तिने Shaadi.com, Book My Show, Winzo, Instacred आणि Stylenook सारख्या अनेक नामांकित कंपन्यांमध्ये उत्पादन डिझाइनिंग आणि संशोधनाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

मायक्रोसॉफ्टकडून मिळाली ऑफर
शाहीनाने सांगितले की, 2021 मध्ये जेव्हा तिला मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून ऑफर मिळाली तेव्हा तिला खरे यश मिळाले. ती तेथे वरिष्ठ संशोधन आणि उत्पादन डिझायनिंग व्यवस्थापक म्हणून (Career Success Story) कार्यरत आहे. ती मायक्रोसॉफ्टच्या अनेक प्रोजेक्ट्सशी निगडीत आहे. फुटपाथवर राहण्यापासून ते मायक्रोसॉफ्टच्या कार्यालयापर्यंत पोहोचण्यापर्यंतचा तिचा संघर्षमय प्रवास हजारो लोकांना पुढे जाण्याची प्रेरणा देत आहे.

आई-वडिलांसाठी घेतलं मोठं घर (Career Success Story)
सुमारे 30 वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशहून मुंबईत उदरनिर्वाहासाठी आलेले शाहीनाचे वडील युनूस अत्तरवाला हे वांद्र्याच्या दर्गा गल्लीत राहत होते. आपल्या पालकांना एकेकाळी फुटपाथवर दिवस काढायला लागले आहेत; ही सल शाहीनाच्या होती. आपल्या कुटुंबाला चांगले घर मिळावे; यासाठी तिने स्वतःच्या हिंमतीवर घर विकत घेतले आणि तिच्या पालकांना भेट दिले; यातून तिचे कर्तृत्व सिध्द होते.

वडिलांच्या नावावर आहे ‘युनुस परफ्यूम’
शाहिना वर्षातून एकदा उत्तर प्रदेशातील तिच्या गावाला भेट देते, जेणेकरून ती ग्रामीण संस्कृतीशी जोडलेली राहते. त्यांनी गावात गरजू मुलांसाठी शाळा उघडली आहे. येथे मुलांसाठी संगणक आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले जाते. याशिवाय तिने तिचे वडील युनूस अत्तरवाला यांच्या नावाने ‘युनुस परफ्युम’ ब्रॅंड सुरू करून गरजू महिला आणि मुलींना स्वयंरोजगारही उपलब्ध करून दिला आहे.

अशी जोपासते सामाजिक बांधिलकी
युनायटेड नेशन्स आणि इंटरनॅशनल लॉमधून कायद्याचे शिक्षण घेतलेल्या शाहिनाला इंडिया टुडे ग्रुपतर्फे अनसंग हिरोजसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. शाहिना एनआयआयटी, आयआयएम, एनएमआयएमएससह अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना उत्पादन डिझाइनिंगवर (Career Success Story) गेस्ट लेक्चर देते. ती एक फाउंडेशन देखील चालवते, ज्याद्वारे ती त्या झोपडपट्टीतील मुलींसाठी काम करते जे अजूनही शिक्षण आणि तंत्रज्ञानापासून वंचित आहेत. शाहिना अनेक स्वयंसेवी संस्थांच्या संचालकांना मार्गदर्शन करते. लैंगिक असमानता आणि लैंगिक छळ यावर ती भारतात आणि परदेशात भाषणे देते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com