करिअरनामा ऑनलाईन । रितीला आयआयटी करायचे होते; पण यामध्ये (Career Success Story) तिला यश आले नाही. ती शाळेपासूनच हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जायची. तिने दहावी आणि बारावीच्या परिक्षेत चांगले मार्क मिळवले होते. आयआयटी (IIT) करता न आल्यामुळे ती निराश झाली नाही. तिने ठरवलेल्या Plan B च्या माध्यमातून तिने वाटचाल केली आणि ती सॉफ्टवेअर इंजिनियर झाली. करिअर घडवण्याच्या वाटेवरचा तिचा प्रवास कसा होता ते पाहूया…
आता सर्व संपले असं वाटू लागलं
रीति कुमारी हिने आयआयटी प्रवेशासाठी प्रयत्न केला तेव्हा यामध्ये तीला अपयश आले. त्यामुळे आपण जीवनात आता पुढे जावू शकणार नाही असे तिला वाटले. वडीलांचे पैसे वाचविण्यासाठी तिने सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. त्यावेळी ती कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत होती. तिला आयआयटी क्रॅक करायची होती. तिने GATE ची तयारी सुरु करण्याचा विचार केला होता. परंतू तो विचार तिने सोडून दिला.
13 मुलाखती दिल्यानंतर मिळाला जॉब (Career Success Story)
रिती कुमारी हीला आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला नाही तेव्हा तिला वाटले होते आता सर्व संपले आहे. तिच्या ट्वीटर अकाऊंटवर तशी पोस्ट तिने केली होती. तिला दहावीत 9.6 सीजीपीए आणि बारावीत 91 टक्के मार्क मिळाले होते. त्यामुळे तिने प्रतिष्ठीत आयआयटी संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी JEE परीक्षा दिली. परंतू तिला यश न मिळाल्याने तिने हार मानली नाही. तिने तिचा प्लान बी सुरु केला आणि 13 मुलाखती दिल्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून वॉलमार्ट कंपनीत तीला नोकरी मिळविली आहे.
असा मिळाला वॉलमार्टमध्ये जॉब
एकदा रीति कुमारी लिंक्डइनवर सर्च करीत असताना तिला कंपन्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची गरज होती अशी माहिती मिळाली. त्यानंतर तिने करीअरचा नवा पर्यायनिवडला. तिचा पहिला इंटरव्यूह एकोलाईटमध्ये झाला. तिने यावेळी एकूण 12 जॉब इंटव्यूह दिले.
रिति कुमारी हीने ट्वीटरवर लिहीले आहे की, “माझी सर्वांना विनंती आहे….लोक अपयश आल्यानंतर धीर सोडतात आणि उदास होतात. आपणापैकी प्रत्येकजण या परिस्थितीतून गेला आहे आणि एक चांगला यशस्वी माणूस म्हणून बाहेर आला आहे. आयआयटीत प्रवेश मिळविण्यात अयशस्वी झाले म्हणून (Career Success Story) माझे काही नुकसान झाले नाही. कारण मी आता जेथे काम करत आहे तेथे केवळ अग्रगण्य कॉलेजातील लोकच काम करतात. त्यामुळे एक संधी गेली तरी दुसरी संधी आपल्यासाठी दार ठोठावते. वेळीच ही संधी ओळखून तुम्हाला त्याचं सोनं करता यायला हवं.” रिती कुमारी हिने वीबीयूच्या युनिर्व्हसिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग एण्ड टेक्नॉलॉजीमधून तिचे इंजिनिअरींग पूर्ण केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com