करिअरनामा ऑनलाईन । घरची परिस्थिती तशी बेताची… कुटुंबाला (Career Success Story) हातभार लावण्यासाठी वयाच्या २० व्या वर्षी ऋषिकेशने मार्केटिंग कंपनीत नोकरी केली. परंतू काही कारणामुळं ही नोकरी टिकली नाही.त्यामुळं त्यानं गावातच एक रोपवाटिका सुरु केली. २००७ मध्ये जेव्हा गावातील लोकांनी कोरफड टाकून दिली तेंव्हा त्याकडे ऋषिकेशने एक संधी म्हणून पाहिले आणि ४००० कोरफडीची रोपे लावली. त्यापासून त्याने साबण, शॅम्पू, ज्यूस अशी विविध उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली. २०१३ पर्यंत त्यानं कोरफडीच्या उत्पादनांचं व्यवसायात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आणि यामधून तो वर्षाला तब्बल ३.५ कोटी रुपयांची उलाढाल करत आहे.
आपण पाहतोय की अनेक सुशिक्षित तरुण सध्या शेतीमध्ये पाऊल ठेवत आहे. विशेष म्हणजे आपल्या ज्ञान आणि कष्टाच्या जोरावर ते मोठ्या प्रमाणात उत्पन्न देखील घेत आहेत. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्याने नोकरीला रामराम ठोकत, कोरफडीच्या शेतीतून आर्थिक प्रगती साधली आहे. त्याने आपल्या शेतात कोरफड लागवड करत, तब्बल साडेतीन कोटींची उलाढाल केली आहे.
ह्रषिकेश ढाणे हा सातारा (Career Success Story) जिल्ह्यातील पाडळी येथील तरुण शेतकरी. हा तरुण कोरफड शेतीतून मोठी प्रगती साधत आहे. पारंपरिक पिकांना फाटा देत कोरफड लागवड करत, त्यापासून साबण, शॅम्पू, ज्यूस अशी विविध उत्पादने तयार करत आहे.
नोकरीत मन रमलं नाही (Career Success Story)
ऋषिकेशने २० व्या वर्षी एका मार्केटिंग कंपनीत नोकरी केली. मात्र, नोकरीत मन रमत नसल्याने, त्याने शेतीमध्ये काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक पिकांऐवजी शेतीमध्ये काहीतरी नवीन पीक घेत, त्यातून अधिक पैसे मिळवण्यासाठी तो नाविन्यपूर्ण पिकाची माहिती घेत होता, अभ्यास करत होता आणि यातूनच त्याने प्रगती साधली आहे.
‘कोरफड वाढवा, लाखो कमवा’
‘कोरफड वाढवा, लाखो कमवा’ ही घोषणा ऋषिकेशच्या कानावर पडली. मात्र, या घोषणेच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याने अनेक शेतकऱ्यांना फसवले होते. तो व्यापारी शेतकऱ्यांच्या (Career Success Story) शेतातील कोरफड खरेदी करण्यासाठी आलाच नाही. ज्यामुळे या शेतकऱ्यांनी कोरफड शेतात तशीच सोडून दिली. ऋषिकेशने या शेतकऱ्यांनी टाकून दिलेल्या कोरफडीची रोपे आणून स्वत:च्या शेतात लावली; आणि इथूनच त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
शेतीतून साधला व्यवसाय
२००७ मध्ये ऋषिकेशने आपल्या शेतात ४००० कोरफडीची रोपे लावली. या पिकापासून त्याने विविध उत्पादने घेतली. त्याने साबण, शॅम्पू, ज्यूस अशी विविध उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली.२०१३ पर्यंत त्याने कोरफड उत्पादनाचे व्यवसायात रुपांतर केले. ऋषिकेशची प्रगती पाहून गावातील शेतकरी त्याच्याकडून कोरफड लागवडीची प्रेरणा घेत आहेत. याच शेतकऱ्यांनी व्यापारी न मिळाल्याने आपली कोरफड शेतात सोडून दिली होती.
वर्षाला होते ३.५ कोटीची उलाढाल (Career Success Story)
ऋषिकेश आपल्या शेतात पिकणाऱ्या कोरफडीपासून सरासरी ८ हजार लिटर उत्पादने बनवतो. या उत्पादनाच्या विक्रीतून त्याला ३० टक्के नफा मिळतो. या व्यवसायातून तो सध्या वार्षिक ३.५ कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. कोरफडीला देश विदेशात चांगली मागणी आहे. आंतराष्ट्रीय मागणीमुळे तसेच देशांतर्गत कोरफडीच्या अनेक पदार्थांना मागणी होत असताना ऋषिकेशला मोठा आर्थिक फायदा होत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com