Career Success Story : शॉक बसल्याने हात कापावा लागला; तरीही जिद्द सोडली नाही; प्राध्यापक बनून तरुणाईला दिली प्रेरणा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । हिमाचल प्रदेशातील (Career Success Story) येथील रहिवासी असलेल्या अंजना ठाकूरने आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक आव्हानाचा सामना केला. ही आव्हानं पेलणं सोपं नव्हतं. डोंगराळ भागात लहानाची मोठी झालेल्या अंजनाची हिम्मत पर्वताएवढी मोठी होती. विजेचा धक्का लागल्याने तिला एक हात गमवावा लागला होता. अशा परिस्थितीत प्रत्येक आव्हानाचा तिने धैर्याने मुकाबला केला. अंजना नुकतीच वनस्पतीशास्त्राची सहाय्यक प्राध्यापिका झाली आहे. इथपर्यंत पोहचण्याचा तिचा प्रवास खडतर होता. पाहूया तिने केलेल्या संघर्षाविषयी..

शॉक बसल्याने हात कापावा लागला
हिमाचल प्रदेशातील पांगणा गावच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर, अंजना ठाकूर 2016 मध्ये कारसोगमध्ये B.Sc. चे शिक्षण घेत होती. काही काम करत असताना तिला विजेचा धक्का लागला आणि ती गंभीर जखमी झाली. शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यावर अनेक महिने उपचार सुरू होते, मात्र डॉक्टरांना या उपचारात यश आले नाही. यानंतर अंजनाला पीजीआय, चंदिगडमध्ये दाखल करावे लागले आणि तेथे डॉक्टरांनी अंजनाचा उजवा हात कापण्यास सांगितले. हा प्रसंग तिच्या कुटुंबासाठी कठीण होता, परंतु तसे करणे त्यांच्यासाठी आणि अंजनाच्या भविष्यासाठी गरजेचे होते. अखेर अंजनाचा हात कापावा लागला. हात गमावल्यानंतर अंजनाही मानसिक दडपणाखाली वावरू लागली.

परिस्थितीपुढे हात टेकले नाहीत
अंजनासाठी ही वेळ फार कठीण होती; पण तिने हार मानली नाही. तिला चांगल्या क्षेत्रात करिअर करुन तिचे स्वप्न पूर्ण करायचे होते आणि आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढायचे होते. अंजनावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना ती डाव्या हाताने लिहायला शिकली णि हॉस्पिटलमधून (Career Success Story) डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिने पुन्हा कॉलेजमध्ये जाऊन अभ्यास सुरू केला. यानंतर तिने B.Sc ची परीक्षा चांगल्या मार्कने उत्तीर्ण केली आणि तिच्या अपंगत्वावर दया दाखवणाऱ्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला तिने आपल्या कर्तृत्वाने उत्तर दिले. अंजनाने सांगितले की, तिचे अपंगत्व तिच्या उज्ज्वल भविष्याच्या मार्गात कधीही अडथळा बनू शकत नाही.

पहिल्याच प्रयत्नात पास झाली (Career Success Story)
यानंतर अंजना ठाकूरने हिमाचल प्रदेश विद्यापीठात M.Sc बॉटनीमध्ये प्रवेश घेतला. अंजनाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. अशा परिस्थितीत बहिणीचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मोठा भाऊ गंगेश कुमार याला चित्रकार म्हणून काम करावे लागले. पण अंजनाला तिची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. तिच्यावर घरच्या आर्थिक परिस्थितीचे दडपण असतानाही तिने विद्यापीठात शिकताना अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. तिने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची (CSIR) खडतर ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (JRF) परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केली आणि आता वनस्पतीशास्त्राची सहाय्यक प्राध्यापक बनून ज्ञान देण्याचे काम करत आहे.

अंजना सांगते…
तिने मिळवलेल्या यशाविषयी बोलताना अंजना सांगते की, “या यशात मला कुटुंबीय आणि शिक्षकांचे पूर्ण सहकार्य लाभले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला प्रा. अजय श्रीवास्तव (Career Success Story) यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. ते हिमाचल प्रदेश राज्य अपंगत्व सल्लागार मंडळाचे तज्ज्ञ सदस्य आणि उमंग फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. त्यांनी मला स्वतःच्या मुलीप्रमाणे समजून प्रत्येक टप्प्यावर मदत केली. याआधीही प्रा. श्रीवास्तव यांनी माझ्यासारख्या अनेक दिव्यांग मुलांचे भविष्य घडवले आहे.” आजकाल आयुष्यात येणाऱ्या छोट्या मोठ्या अडचणींचा सामना न करता ध्येय मध्येच सोडणाऱ्या तरुण-तरुणींसाठी अंजनाची कहाणी प्रेरणा देणारी आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com